शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

दहशतीमुळे ‘सातच्या आत घरात’

By admin | Updated: December 23, 2014 00:29 IST

कोणेगाव परिसरातील चित्र : बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थ भयभीत

उंब्रज : कोणेगाव, ता. कऱ्हाड येथे शेतात बिबट्याचा वावर दिसून आला आहे. यामुळे कोणेगावातील शेतकरी व ग्रामस्थ यांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले असून, लोक सातच्या आत घरात, पुन्हा दिवस उजेडल्यावर घराबाहेर पडू लागलेत. दरम्यान, कृष्णाकाठावर बिबट्याचा वावर दिसून आल्यामुळे कोयनाकाठाबरोबर कृष्णाकाठावर बिबट्याची दहशत निर्माण निर्माण झाली आहे.कोणेगाव येथील गजानन ढाणे हे कांबीरवाडीकडून कोणेगावला निघाले होते. याठिकाणी रेल्वेगेट आहे. या गेटच्या बाजूच्या उसात त्यांना बिबट्या दिसला. ते दुचाकीवर असल्यामुळे त्यांनी लवकर गाव गाठले, तर माणिक भोपते हे शेतात गेले असता त्यांनाही उसाच्या शेतात बिबट्या आढळून आला. काही दिवसांपूर्वी बेलवाडी रस्त्यावरही आनंदराव जाधव यांना बिबट्या दिसला होता.बिबट्याचा वावर शिवारात दिसून येत असल्यामुळे कोणेगावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी शेतात जाण्यासाठी कचरत आहेत. यामुळे वनविभागाने तातडीने या बाबींकडे लक्ष देऊन बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)