शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधन बाजारात..: माणमधून ५३ तर खटावमधून ३ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 23:03 IST

चारा आणि पाणी उपलब्ध नसल्याने पशूुधन अल्प किमतीत विकण्याची वेळ दुष्काळी भागातील शेतकऱ्यांवर आली आहे. जनावरे गोठ्यात पाय आपटून मरण्यापेक्षा त्यांची बाजारात नेऊन विक्री करण्यावर

सागर गुजर ।सातारा : चारा आणि पाणी उपलब्ध नसल्याने पशूुधन अल्प किमतीत विकण्याची वेळ दुष्काळी भागातील शेतकऱ्यांवर आली आहे. जनावरे गोठ्यात पाय आपटून मरण्यापेक्षा त्यांची बाजारात नेऊन विक्री करण्यावर शेतकºयांनी भर दिला आहे. माण तालुक्यातून ५३ तर खटाव तालुक्यातून ३ प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले असून, या प्रस्तावांच्या मंजुरीनंतरच दुष्काळी जनतेची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे.

माण तालुक्यातील दहिवडी, मार्डी, म्हसवड, कुकुडवाड, आंधळी, शिंगणापूर, मलवडी, गोंदवले बुद्रुक या मंडलांतील ५३ गावांमध्ये चारा छावणी सुरू करण्यासंदर्भात विविध सामाजिक व सहकारी संस्थांमार्फत प्रशासनाकडे प्रस्ताव सादर झाले आहेत. खटाव तालुक्यातील कातरखटाव व मायणी या दोन मंडलांतील दोन गावांत चारा छावणी सुरू करण्यासाठी ३ प्रस्ताव दाखल झाले आहेत.

दरम्यान, शासनाने मागील आठवड्यामध्ये दुष्काळी भागामध्ये चारा छावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील दुष्काळी भागातील परिस्थितीचा अंदाज घेऊन चारा छावणी मागणीचे प्रस्ताव शासनाने मागवून घेतले आहेत.

माण तालुक्यातील पांगरी, वडगाव, बिजवडी, जाधववाडी, मोगराळे, येळेवाडी, बिजवडी, बिदाल, बोडके, जाधववाडी, बिरोबानगर पांगरी, तोंडले, भाटकी, माळवाडी, हवालदारवाडी, इंजबाब, संभूखेड, भालवडी, मार्डी, वाकी, हिंगणी, म्हसवड, पळसावडे, दिवड, कुकुडवाड, टाकेवाडी, आंधळी, पांढरवाडी, कासरवाडी, शेनवडी, पानवण, पाचवड, अनभुलेवाडी, वावरहिरे, दानवलेवाडी, राजवडी, बिजवडी, मलवडी, पिंगळी बुद्रुक, पिंपरी, पळशी, गोंदवले खुर्द या गावांमध्ये तसेच खटाव तालुक्यातील एनकूळ, हिवरवाडी या गावांमध्ये चारा छावण्या सुरू करण्यासाठी विविध संस्थांनी प्रस्ताव सादर केले आहेत.

या प्रस्तावांची तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी यांच्या वतीने तपासणी होणार आहे. हे प्रस्ताव संबंधित तालुक्यांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. योग्य प्रस्ताव प्रांत कार्यालयामार्फत जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात येणार आहेत.२८ हजार ३७६ पशुधन बाधितदुष्काळी तालुक्यातील २८ हजार ३७६ पशुधन दुष्काळामुळे बाधित झाले आहेत. शेतकरी मोठ्या कष्टाने पशुधन जगवित असून, चारा छावण्या कधी सुरू होणार? याकडे दुष्काळी जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. 

माण तालुक्यावर नेहमीच पावसाने पाठ फिरवली आहे. गेल्या पावसाळ्यातही अत्यल्प पाऊस झाला असल्याने जनावरे जगविण्याची मोठी कसरत करावी लागत आहे. शासनाने लवकरात लवकर चारा छावण्या सुरू कराव्यात.- संभाजी कदम, दहिवडीदुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी जनावरे घेऊन बाजार गाठू लागले आहेत.