शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

अवकाळीने शहरवासीयांची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 22:42 IST

सातारा : शहर परिसरात मंगळवारी सकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळच्या वेळेतच पाऊस पडल्याने चाकरमान्यांची भलतीच दैना झाली. ...

सातारा : शहर परिसरात मंगळवारी सकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळच्या वेळेतच पाऊस पडल्याने चाकरमान्यांची भलतीच दैना झाली. सलग तीन तास पाऊस सुरू होता. दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिले.पावसाळ्यातील पाऊस थांबल्याने लोकांनी छत्र्या, रेन कोट अशा वस्तू घरात ठेवून टाकल्या होत्या. मात्र, पावसाने अचानक हजेरी लावल्याने पावसाळी जामानिमा पुन्हा शोधून काढावा लागला. पाऊस अवकाळी असल्याने कामासाठी घराबाहेर पडण्याच्या तयारीत असणारे अनेकजण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. दुपारनंतर पाऊस विश्रांती घेईल, असे अंदाज बांधून काहीजण रेनकोट, छत्री न घेताच आपल्या दुचाकीवरून घराबाहेर पडले. मात्र पावसाने त्यांनाही गाठले. रस्त्याच्या कडेला असणारी झाडे, बस स्टॉप, दुकानांची पडचिती, अशा ठिकाणी जागा मिळेल तिथे पावसापासून बचावासाठी लोक उभे राहत होते.सलग तीन तास झालेल्या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साठून राहिले होते. गोडोली, सदरबझार परिसरातील सैनिक नगर, मध्यवर्ती बसस्थानक, राजवाडा, जिल्हा परिषद चौक या परिसरात पाणी साठून राहिले. शहरातील अनेक रस्त्यांना खड्डे पडले आहेत, या खड्ड्यांमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठून राहिले होते.शहरातील बोगदा परिसरात डोंगराचे दगड कोसळले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. नगरपालिकेचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी हे दगड हटवले. दरम्यान, ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावली. रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत होते.सायंकाळ होताच हवेत गारव्याचे प्रमाण वाढलेसातारा शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अधूनमधून सूर्यनारायणाचे दर्शन होत असले तरी किमान तापमान १७ ते १९ अंश सेल्सिअसवरउतरले आहे. ढगाळ वातावरणामुळे हवेत थंडीची तीव्रता वाढत चालली आहे.मंगळवारी सकाळी झालेल्या या पावसामुळे थंडीत आणखीनच वाढ झाली. शहरातसह ग्रामीण भागात आता पहाटे व रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटू लागल्या असून, उबदार कपड्यांनाही मागणी वाढली आहे.छत्र्या अन् पोत्याची खोळपावसाला सुरुवात झाल्यानंतर मार्केट यार्ड परिसरातील भाजी विक्रेत्यांची एकच धांदल उडाली. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनीही पावसापासून बचाव व्हावा, यासाठी तातडीने सुरक्षित ठिकाण गाठले. पावसाची चिन्हे लक्षात घेता अनेक शेतकऱ्यांनी आपाल्यासोबत छत्र्या आणल्या होत्या. पाऊस पडताच या छत्र्या खुल्या झाल्या. अनेकांनी पारंपरिक पोत्याची खोळ अंगावर घेऊन पावसापासून स्वत:चा बचाव केला.