शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घशाला कोरड अन् मृगजळाची भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:49 IST

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्याला उन्हाच्या झळांनी हैराण केले आहे. त्यातच आग ओकणाऱ्या सूर्यामुळे जमिनीतील उपलब्ध पाणीही मोठ्या प्रमाणावर शोषून घेतले जात आहे. या परिस्थितीत दुष्काळावर मात करण्याऐवजी जिल्हा प्रशासन मात्र पाणी साठल्याचा गाजावाजा करत दुष्काळ लपवायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. ‘घशाला कोरड अन् मृगजळाची भुरळ,’ ...

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्याला उन्हाच्या झळांनी हैराण केले आहे. त्यातच आग ओकणाऱ्या सूर्यामुळे जमिनीतील उपलब्ध पाणीही मोठ्या प्रमाणावर शोषून घेतले जात आहे. या परिस्थितीत दुष्काळावर मात करण्याऐवजी जिल्हा प्रशासन मात्र पाणी साठल्याचा गाजावाजा करत दुष्काळ लपवायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. ‘घशाला कोरड अन् मृगजळाची भुरळ,’ अशी जणू ही परिस्थिती आहे.संपूर्ण एप्रिल महिन्यात उन्हाळ्याने भलतेच हैराण केले. आता मे महिन्याच्या तोंडावर पोहोचल्यानंतर पुढे काय होईल, याची धास्ती सर्वांनाच लागून राहिली आहे. अनेक गावे टंचाईग्रस्त झाली आहे. पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ दुष्काळी जनतेवर आली आहे. केवळ माण, खटावमध्येच नव्हे तर फलटण, कोरेगाव, खंडाळा इतकंच काय तर पावसाचे आगर असणाºया वाई, महाबळेश्वर आणि जावळी या तालुक्यांतही पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. उन्हाळ्यामुळे पिकांना पाणी जास्त लागते तसेच जनावरांना जगवितानाही शेतकºयांची त्रेधा उडताना पाहायला मिळत आहे. बोअरवेल, विहिरींनी तळ गाठला आहे. शेततळी कोरडी पडू लागली आहेत.या परिस्थितीत प्रशासन केवळ आकडेवारी करत दुष्काळग्रस्तांच्या जखमांवर मीठ फिरविताना दिसत आहे. टँकर मागणीचे प्रस्ताव येत असतानाही प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे.पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू...कलेढोण परिसरातील लोक पाण्यासाठी टाहो फोडत आहेत.चार ते पाच दिवसांत टँकर सुरू न केल्यास तहसीलदारकार्यालयावर महिलांचा हंडा मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाआहे. गारुडी, हिवरवाडी, ढोकळवाडी, अनफळ, कान्हरवाडी, पाचवड, औतरवाडी, विखळे गावांतील लोकांची पिण्याचे पाण्यासाठी टँकरसुरू करावी, अशी मागणी गेल्या फेब्रुवारीपासून सुरू आहे. पंचायतसमिती सदस्या मेघाताई पुकळे यांनी गटविकास अधिकारी तसेचतहसीलदार, प्रांताधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून पत्र देऊन टँकरची मागणी केली. त्यासाठी पाठपुरावाही केला; परंतु तरीही एकाही गावात टँकर सुरू नसल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू आहे.बोअरचे पाणी आटले; टॅँकरच्या मंजुरीला मिळेना मुहूर्त...अनफळे, ता. खटाव येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू असून, पाण्याचा एकमेव आधार असलेल्या बोअरवेलचे पाणीसुद्धा दोन महिन्यांपूर्वी आटले आहे. सध्या येथील खंडोबा मंदिरालगत असलेल्या बोअरवेलमधून सकाळी अर्धा तासच पाणी ग्रामस्थांना मिळत असून, एका कुटुंबाला केवळ चार ते पाच घागरी पाणी मिळत आहे. ग्रामपंचायतीने गेल्या दीड महिन्यापूर्वी शासन दरबारी टँकरची मागणी केली असून, अद्यापही टँकर मंजुरीला मुहूर्त मिळाला नाही.प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे संतापखटाव-माणमधील अनेक गावे तहानेने व्याकूळ असताना प्रशासन मात्र वेळकाढूपणा करीत आहे. टंचाई जाहीर झाली नसल्याचे तुणतुणे वाजवणारे अधिकारी आता टंचाईच्या प्रस्तावात त्रुटी काढून टँकर सुरू करण्यास चालढकल करीत आहेत. असंवेदनशील प्रशासनाविरुद्ध नागरिकांतून संताप व्यक्त केला जात असून, जीव गेल्यावर टँकर सुरू करणार का? असा संतप्त सवाल केला जात आहे. यंदा खटाव व माणमधील सुमारे ७० ते ८० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. संबंधित गावांनी टँकर सुरू होण्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केलेत. मात्र, दोन महिन्यांपासून ते शासन दरबारी धूळखात पडलेत.