शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

मद्यधुंद कारचालकाने नऊजणांना ठोकरले; चौघेजण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:48 IST

म्हसवड : पंढरपूरहून साताऱ्याकडे जाताना मंगळवारी रात्री मद्यपी वाहनचालकाने पिलीव ते गोंदवले-दरम्यानच्या अंतरात ८ ते ९ जणांना ठोकरले. त्यातील ...

म्हसवड : पंढरपूरहून साताऱ्याकडे जाताना मंगळवारी रात्री मद्यपी वाहनचालकाने पिलीव ते गोंदवले-दरम्यानच्या अंतरात ८ ते ९ जणांना ठोकरले. त्यातील चौघेजण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर मद्यधुंद चालकाचा म्हसवड पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर गोंदवलेत मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने डंपर आडवा लावून त्याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, दि. १९ रोजी रात्री आठच्या सुमारास गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील मुख्य रस्त्यावर सामसूम होत चालली असतानाच मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्यासह भास्कर कट्टे यांच्याशी म्हसवडच्या शेखर वीरकर यांनी संपर्क साधला. एक चारचाकी रस्त्याने वाहनांना ठोकरत येत असल्याबाबतची माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर गोंदवले ग्रामस्थांनाही ही माहिती समजताच वेगाने (पान १२ वर)अपघात करत निघालेल्या वाहनाला अडविण्यासाठी धावपळ सुरू झाली. अवघ्या काही मिनिटांतच संपूर्ण रस्ता रिकामा करण्यात आला.अपघाताला कारणीभूत ठरणारे वाहन थांबविण्यासाठी सातारा-पंढरपूर या मुख्य रस्त्यावरच धैर्यशील पाटील यांनी स्वत:चा डंपर आडवा उभा केला. काही मिनिटांतच (एमएच ११ सीजी ३६६०) ही पांढºया रंगाची चारचाकी वेगाने येताना दिसली. त्याचक्षणी तातडीने ही गाडी थांबविण्यासाठी लोकांची धावपळ सुरू झाली. रस्त्यावरच डंपर आडवा लावल्यामुळे चालकाला गाडी थांबविण्याशिवाय पर्यायच नव्हता. चालक हणमंत तात्यासो गेजगे (वय ३५, रा. कारखेल, ता. माण) याने गाडी थांबविताच लोकांनी गराडा घातला. परंतु गाडीची दारे व काचा बंद होत्या. त्यातच वाहन सुरूच असल्याने धोका अधिकच वाढला होता. मात्र, याचवेळी धाडसाने धैर्यशील पाटील यांनी वाहनावर उभे राहून चालकाला गाडी बंद करण्यास सांगितले. तरीही चालक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने अखेर काचा फोडून गाडी बंद करण्यात आली.चालक हणमंत गेजगे यालाही गाडीतून बाहेर काढून लोकांनी चांगलाच चोप दिला. याचवेळी या थरारक वाहनाचा पाठलाग करणारे पोलीसही घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर लोकांनी चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. या अपघात करत आलेल्या वाहनाचा म्हसवडमधूनच बंटी माने व त्यांच्या सहकाऱ्यांनीही पाठलाग सुरू केला होता. मात्र, गोंदवल्यात हे वाहन थांबविल्यानंतर त्यांचाही पाठलाग थांबला. दरम्यान, या वाहनाने वीरकरवाडी (ता. माण) येथील दोघांना पिलीव घाट परिसरात उडवून गंभीर जखमी केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असली तरी संपूर्ण प्रवासादरम्यान आणखी कितीजणांना अपघातग्रस्त केले? याबाबत मात्र सविस्तर माहिती मिळालेली नव्हती. म्हसवड पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन व चालकाला ताब्यात घेतले आहे.