शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ढोल-ताशांच्या तालावर लाडके गणराय आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 23:22 IST

सातारा : ढोल-ताशा आणि पारंपरिक वाद्याच्या तालावर विघ्नहर्त्या गणरायाचे सोमवारी ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत आगमन झाले. महागाई आणि दुष्काळाचे सावट ...

सातारा : ढोल-ताशा आणि पारंपरिक वाद्याच्या तालावर विघ्नहर्त्या गणरायाचे सोमवारी ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत आगमन झाले. महागाई आणि दुष्काळाचे सावट असतानाही लाडक्या गणरायाचे भक्तांनी उत्साहात स्वागत केले. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता.सकाळपासून बॉम्बे रेस्टॉरंट परिसर, राजवाडा परिसरातील दुकानांमधून श्रींची मूर्ती खरेदी करण्यासाठी आबालवृद्धांनी मोठ्या भक्तिभावाने लाडक्या बाप्पांना वाजतगाजत आपल्या घरी विराजमान केले. मोठ-मोठ्या मूर्ती खरेदी करणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर-ट्रॉलीतून गणरायाची मूर्ती ढोल-ताशांच्या तालावर नाचत आणि गुलालाची उधळण करीत मंडळांच्या ठिकाणी विराजमान केल्या. डोक्यावर गणपती बाप्पा मोरया गिरवलेली टोपी, कपाळावर भगवी पट्टी आणि गुलालाची उधळण करीत हातात, डोक्यावर मूर्ती घेतलेल्या गणेशभक्तांच्या चेहºयावर बाप्पांच्या आगमनाचा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. तर प्रत्येक रिक्षा आणि वाहनांत ‘ताशाचा आवाज तरारारा झाला रे गणपती माझा नाचत आला’ हे गाणे भक्तांच्या आनंदात भर घालताना दिसत होते.खणआळी रस्त्यावर दुतर्फा गणेशाच्या पूजेचे साहित्य विक्री करणारी दुकाने थाटली होती. यात पाच प्रकारची फळे आणि गणरायाच्या मखरीसाठी लागणारे सजावटीचे साहित्य विक्री करणाºया दुकानांच्या रांगा लागल्या होत्या. या रांगांतून वाट काढत गणेशभक्त आवडत्या श्रींची मूर्ती खरेदी करण्यासाठी मैदानाकडे जात होते. त्यामुळे दुचाकी वाहने आणि भाविकांची एकच झुंबड पाहायला मिळाली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.