शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

पाटण तालुक्यातील दवाखाने औषधाविना , रुग्णांच्या आरोग्याशी खेळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 23:55 IST

चाफळ : पाटण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालयातही औषधांचा ठणठणाट झाला आहे. त्यामुळे रुग्णांना ताप, थंडीची औषधेही बाहेरून विकत घ्यावी लागत आहेत. विशेष म्हणजे औषधांचा पुरवठा करण्याचे कंत्राट एका संस्थेला देण्यात आले

ठळक मुद्देहजारो रुग्णांची गैरसोय : प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयात तुटवडा

चाफळ : पाटण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालयातही औषधांचा ठणठणाट झाला आहे. त्यामुळे रुग्णांना ताप, थंडीची औषधेही बाहेरून विकत घ्यावी लागत आहेत. विशेष म्हणजे औषधांचा पुरवठा करण्याचे कंत्राट एका संस्थेला देण्यात आले आहे. परंतु ही संस्थाच गत सहा महिन्यांपासून औषधांचा पुरवठा करत नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. त्यामुळे शासनच ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

शासनाने ग्रामीण भागातील ग्रामस्थांना गाव व परिसरात उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालये सुरू केली आहेत. या दवाखान्यातील भौतिक सोयीसुविधांना बळ देण्याचे कामही शासन स्तरावर करण्यात आले आहे. शिवाय ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम व योजनाही राबवण्यात येत आहेत. मात्र औषधे पुरवणारी संस्था व शासनाच्या उदासीन कारभारामुळे पाटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाºयांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

पाटण तालुक्यात एकूण १३ प्राथमिक आरोग्य केंद्र, ६३ उपकेंद्र व २ ग्रामीण रुग्णालये आहेत. एकीकडे तालुक्याच्या या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची वानवा असल्यामुळे रुग्णांना औषधे देता येईनात. तर दुसरीकडे बºयाचशा उपकेंद्रांना कर्मचारी नसल्याने ती ओस पडू लागली आहेत. तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांतून गत दोन महिन्यांपासून मागणीच्या प्रमाणात औषध पुरवठा करणे दूरच एक दिवस पुरेल एवढीही औषधे देता येत नसल्याने अधिकाºयांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. परिणामी अनेक ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडू लागले आहेत.

सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने डासांची उत्पत्ती वाढून त्यापासून उद्भवणाºया आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आरोग्य केंद्रांना औषधे मिळत नसल्याने ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडत आहे. एकंदरीतच ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता औषधांच्या तुटवड्यामुळे पूर्णपणे हतबल झाली असून, शासनाने औषध पुरवठा करून रुग्णांची होणारी परवड थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

कंपनीला जाब विचारणार कोण?औषध व साहित्य खरेदीचे केंद्रीकरण करण्याचा निर्णय गतवर्षी जुलै महिन्यात मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार एका कंपनीवर औषधै पुरवण्याची जबाबदारी दिली गेली आहे. परंतु आता वर्ष पूर्ण होऊनसुद्धा संबंधित कंपनीकडून औषध व साहित्याचा पुरवठा केला गेला नाही. एकंदरीतच रुग्णांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असून, संबंधित कंपनीला कोण जाब विचारणार, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. 

रुग्णालयांमध्ये वादावादीचे प्रकारपाटण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालयात सर्दी, खोकला, तापाचे औषधही रुग्णांना मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे केवळ रुग्णांची तपासणी करून त्यांना बाहेरुन औषधे घेण्यास सांगण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडत आहेत. 

 

पाटण तालुक्यात गत दोन ते तीन महिन्यांपासून औषधांचा तुटवडा जाणवत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला कळवले होते. जिल्हा प्रशासनानेही तातडीने औषध खरेदीसाठी तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रास दहा हजार रुपये दिले आहेत. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत यातून खरेदी केलेली औषधे अपुरी पडत आहेत. शासनाने एका संस्थेला औषध पुरवठा करण्याचे कंत्राट दिले आहे. परंतु या संस्थेकडूनच जिल्हा प्रशासनास औषधे पुरवली नसल्याने सर्वत्रच औषधांचा तुटवडा जाणवत आहे.- डॉ. दीपक साळुंखेतालुका वैद्यकीय अधिकारी, पाटण