शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी भागातील पेरणीला पाण्याअभावी ब्रेक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:41 IST

सातारा : यावर्षी परतीचा पाऊस झाला नसल्याने पूर्व भागात पाण्याची उपलब्धता आणि जमिनीत पुरेशी ओल नाही, त्यामुळे रब्बी पेरणीच्या ...

सातारा : यावर्षी परतीचा पाऊस झाला नसल्याने पूर्व भागात पाण्याची उपलब्धता आणि जमिनीत पुरेशी ओल नाही, त्यामुळे रब्बी पेरणीच्या क्षेत्रात यंदा घट होणार आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात ३८.८१ टक्के तर माण तालुक्यात अवघ्या १७.५३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. फलटण आणि खंडाळा तालुक्यातही कमी पेरणी झाल्याचे दिसत आहे. विशेषत: माण आणि खटाव तालुक्यांतील शेतकऱ्यांसमोर पेरणीचे खरे संकट असून, पेरणीसाठी काही दिवसच राहिले आहेत.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगाम घेण्यात येतो. तर साधारणपणे आॅक्टोबर महिन्यापासून पेरणी होते. चांगला पाऊस झाला तरच शेतकºयांना उत्पादन मिळते; पण अनेकवेळा पावसाअभावी पेरण्या करूनही हाती फारसे उत्पन्न येत नाही. सध्या अशीच स्थिती जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामध्ये माण, खटावला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असताना शेतीसाठी पाणी मिळणे अवघड झाले आहे. त्यातच जमिनीत ओल नसल्याने पेरणी करून काय फायदा, असा प्रश्न शेतकºयांसमोर आहे. त्यामुळे शेतकºयांनी पेरणीकडे पाठ फिरवली आहे. तर यापुढे पाऊस पडणार नसल्याने चारा नाही, जनावरे कशी जगवावीत? असाही प्रश्न आहे.सातारा जिल्ह्यात सर्वसाधारणपणे २ लाख १४ हजार ८२२ हेक्टर क्षेत्र हे रब्बी हंगामातील आहे. त्यामध्ये ज्वारीचे सर्वाधिक असून, १ लाख ३९ हजार ११२ हेक्टर आहे. त्याखालोखाल गव्हाचे ३४ हजार ४७३ हेक्टर आहे तर मका १० हजार ९४१, हरभरा २८ हजार ८६३ हेक्टर आहे. रब्बी हंगामात ज्वारी मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. जिल्ह्यात सर्वाधिक माण तालुक्यात ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ६६५ हेक्टर आहे. त्याखालोखाल खटाव आणि फलटण तालुक्यात क्षेत्र आहे; पण यंदा जिल्ह्यात आतापर्यंत ज्वारीची अवघी ४७.५० टक्के म्हणजेच ६६ हजार ८४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. माणमध्ये सर्वाधिक क्षेत्र असूनही आतापर्यंत फक्त ४६८८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ३४ हजार ४७३ हेक्टर असले तरी आतापर्यंत ८.०६ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. हरभरा पेरणीचे क्षेत्रही ३४.४७ टक्के इतकेच आहे.आता नोव्हेंबर महिना अर्धा झाला असताना जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ३८.८१ टक्के पेरणी झाली आहे. जमिनीत ओल कमी आणि पाण्याची उपलब्धता नसल्यानेच पेरणी होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. आता यापुढे माण तालुक्यात बहुतांशी गावात पेरणी होणार नाही. कारण, ओल नसल्याने शेतकºयांनी पेरणीची आशा सोडून दिली आहे. त्यामुळे माण तालुक्यातील पेरणीत यंदा मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.माणमध्ये अद्याप गहू पेरणी नाही...सप्टेंबर महिन्यात परतीचा पाऊस झाला की सुरुवातीला ज्वारीची पेरणी करण्यात येते. त्यानंतर गहू, हरभरा घेण्यात येतो; पण आता नोव्हेंबर महिना मध्यावर आला. त्यातच पाऊस नसल्याने पूर्व भागात गहू आणि हरभºयाचे क्षेत्र अत्यल्प होणार आहे. या दोन्ही पिकांचे क्षेत्र ५० टक्क्यांच्या वर जाईल की नाही, अशी साशंकता निर्माण झाली आहे. कारण माण तालुक्यात आतापर्यंत तरी गहू पेरणीची नोंद झाली नसल्याचे दिसून आले आहे. तर पश्चिम भागात पाऊस झाला असल्याने पेरणी चांगली होईल, असा अंदाज आहे.ज्वारी लागली वाळू...माण, खटाव तालुक्यांतील अनेक गावांत असणाºया ओलीवर शेतकºयांनी आॅक्टोबर महिन्यात ज्वारीची पेरणी केली होती. मात्र, त्यानंतर पाऊस झाला नाही. सध्या उगवून आलेली ज्वारी जळू लागली आहे. तर अनेक शेतकºयांनी मशागत करून जमीन मोकळी ठेवली आहे.