शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

दुष्काळ संपवणारं पाणी आलं रं आलं..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 23:50 IST

सातारा : दुष्काळात भरडणाऱ्या माण तालुक्याच्या वरकुटे मलवडी परिसरातील १६ गावांत पाण्याचं मोठं दुर्भिक्ष; पण आता टेंभू योजनेतून प्रथमच ...

सातारा : दुष्काळात भरडणाऱ्या माण तालुक्याच्या वरकुटे मलवडी परिसरातील १६ गावांत पाण्याचं मोठं दुर्भिक्ष; पण आता टेंभू योजनेतून प्रथमच आलेलं पाणी दुष्काळग्रस्तांची तहान भागवणार आहे. जलवाहिनीतून सुटलेलं हे पाणी माळरान, ओढ्यातून खळाळत महाबळेश्वरवाडी तलावाच्या दिशेने निघालं असून, ग्रामस्थांचा उत्साह आणि आनंद गगनात मावेनासा झालाय.मूळत: टेंभू उपसा सिंचन योजना ही सांगली आणि सोलापूर जिल्ह्यासाठी आहे. या योजनेतून २१८ गावांतील क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यामध्ये कºहाड तालुक्यात एक, सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील ३२ आणि सांगली जिल्ह्यातील १८५ च्या आसपास गावांना या योजनेचा फायदा होणार आहे. त्यासाठी २२ टीएमसी पाण्याची आवश्यकता असते. कोयना, तारळी आणि वांग धरणातून हे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. त्यात कोयनेतील सर्वाधिक १८ टीएमसी पाणी या टेंभू योजनेतून सिंचनासाठी दिले जाते. सद्य:स्थितीत या योजनेचे काम प्रगतिपथावर असून, अजूनही कवठेमहंकाळ, सांगोला तालुक्यांत कालव्याची कामे सुरू आहेत. लवकरच ही योजना पूर्णत्वास जाऊन तेथील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे; पण ही योजना सातारा जिल्ह्याच्या सीमेवरून जात असताना त्यातील पाणी माण आणि खटाव तालुक्यातील गावांना मिळावे, अशी मागणी होती. त्याप्रमाणे अनेकांनी लढा सुरू केला होता. त्याला यश आले.सातारा जिल्ह्याच्या सीमेवरून जाणाºया टेंभू कालव्याच्या माध्यमातून माण तालुक्यातील १६ गावांसाठी फायदा होणार आहे. या गावांसाठी ०.९२ ‘दलघमी’ पाणी मिळत असून, रोटेशनप्रमाणे सोडण्यात येणार आहे. यामध्ये वरकुटे मलवडीसह काळचौंडी, महाबळेश्वरवाडी, कुरणेवाडी, बनगरवाडी आदी गावांना लाभ मिळणार आहे. शिवाय हे पाणी महाबळेश्वरवाडी तलावात येणार आहे. या तलावाखाली चार गावांच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी आहेत. त्यामुळे संबंधित गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात निघणार आहे. तसेच बंधाºयातही पाणीसाठा होण्याने विहिरींची पाणी पातळी वाढण्याने काहीप्रमाणात शेतीपाण्याचाही प्रश्न संपुष्टात येईल. हे पाणी आटपाडी कालव्याच्या किलोमीटर १३ मधून माण तालुक्याला मिळत आहे.एकंदरीतच सातारा-सांगली जिल्ह्याच्या सीमेवरून जाणाºया या टेंभू योजनेमुळे कायम दुष्काळी असणाºया माण तालुक्यातील अनेक गावांची तहान कायमस्वरुपी भागणार आहे.