शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
3
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
7
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
8
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
9
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
10
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
11
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
12
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
13
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
14
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
15
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
16
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
18
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
19
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
20
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

दुष्काळी शेतकरी गप्प ‘गार’च!

By admin | Updated: December 26, 2014 00:52 IST

रब्बी हंगामातील सर्वसाधारण क्षेत्र दोन लाख १७ हजार ६०० हेक्टर आहे. यावर्षी दोन लाख ४५ हजार ९०४ हेक्टरवर पेरणी

नितीन काळेल - सातारा  -कधी जेमतेम पाऊस तर कधी दुष्काळ, अशा स्थितीत जगणाऱ्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना यंदा निसर्गाचा चांगलाच फटका बसला. मार्च महिन्यात दोन-तीन वेळा अवकाळी पाऊस आणि गारपीट होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. फळबागा कोलमडल्या. त्यानंतर डिसेंबर महिन्यातही अवकाळी पाऊस व गारपिटीने तडाका दिल्याने शेतकरी पुन्हा गप्प ‘गार’ झाला. जिल्ह्याचा पूर्व भाग दुष्काळी तर पश्चिमेकडील भाग हा सुजलाम्- सुफलाम् समजला जातो. पूर्व भागात खरीप हंगामात बाजरी, मटकी, कडधान्ये घेण्यात येतात. तर पश्चिम भागात ऊस, सोयाबीन, भात आदींसारखी महत्त्वपूर्ण पीक घेतली जातात. असे असले तरी अलीकडील काही वर्षांत दुष्काळी भागातील आर्थिकस्तर उंचावत असल्याचे दिसत आहे. याला कारण म्हणजे फळबागा. दुष्काळी, माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगावचा काही भाग या तालुक्यांत डाळिंब, द्राक्षांच्या फळबागा होत आहेत. त्याचबरोबर ऊसक्षेत्रातही वाढ होऊ लागली आहे. पाऊस चांगला झाला तर येथील शेतकरी ‘राजा’ होऊनच वावरत असतो; पण दुष्काळात पूर्ण कोलमडून पडतो. मागील दोन वर्षांपूर्वीचा दुष्काळ मागे टाकून येथील शेतकरी पुन्हा उभा राहिला आहे. जिल्ह्यात यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या लांबल्या. काही ठिकाणी पेरण्याच झाल्या नाहीत. परिणामी खरीप हंगामात ८४.१६ टक्के इतक्याच पेरण्या होऊ शकल्या. खरिपातील सर्वसाधारण क्षेत्र तीन लाख ८३ हजार ९०९ हेक्टर असून, त्या तुलनेत तीन लाख २३ हजार हेक्टरवरच पेरण्या झाल्या. खरीप हंगामात माण तालुक्यातील तीन गावे ५० पेक्षा कमी पैसेवारीची म्हणून जाहीर करण्यात आली होती. रब्बी हंगामातील सर्वसाधारण क्षेत्र दोन लाख १७ हजार ६०० हेक्टर आहे. यावर्षी दोन लाख ४५ हजार ९०४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. शंभर टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उशिरा होऊनही चांगला पाऊस झाला. खरीप हंगामात काही दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले, काही दुकाने निलंबित करण्यात आली होती. त्यामध्ये खतांचे ९, बियाण्यांचे ८, कीटकनाशक विक्री परवानाधारकांचे ७, खताचे १७ आदींवर कारवाईचा जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत बडगा उगारण्यात आला होता. तसेच बियाण्यांचे ३१९, खतांचे ११६ नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. जिल्ह्यात यावर्षी १३२ टक्के पाऊस जिल्ह्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९१८.८९ मि.मी. एवढे आहे. ३१ आॅक्टोबर अखेर जिल्ह्यात १२१६.०२ मि.मी. पाऊस झाला. हंगामाच्या सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसाची टक्केवारी ही १३२ एवढी आहे. सातारा तालुक्यात ११४ टक्के, जावळी १०२, टक्के, खंडाळा ११६, महाबळेश्वर २५४ टक्के, कोरेगाव ७३ टक्के, माण ८७ टक्के असा पाऊस झाला. दरम्यान, राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने यंदा भात पिकाची नवीन योजना सुरू झाली. ऊस ठिबक सिंचन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शतकोटी वृक्ष लागवडीअंतर्गत साडेचार लाख झाडे लावण्यात आली.यावर्षी जिल्हा परिषदेने कृषी पर्यटनावर आधारित नावीन्यपूर्ण योजना राबविण्याचे प्रस्तावित केले आहे. इच्छुक शेतकऱ्यांना कृषी पर्यटनाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यातून त्यांना आर्थिक प्राप्ती होण्यास मदत होईल, असे सांगण्यात आले.