शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

आटणीत दुष्काळी; कलाकुसरीत बंगाली...

By admin | Updated: March 25, 2015 00:46 IST

सोन्यासारखं जीवन : श्रीलंका, दुबईमध्येही गलाई व्यवसायिक

सोने म्हटले की समोर येते ते सोनार समाज व शोरुमवाले विक्रेते. पण, सोने शुध्द करणे व त्यापासून दागिने बनविणारेही तितकेच महत्वपूर्ण असतात. सोने शुध्द करण्यात सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील लोक आहेत. त्यालाच आपण आटणी (गलाई) व्यवसायिक म्हणतो. तर कलाकूसर दागिने बनविण्यात पश्चिम बंगालचे कारागिर पुढे आहेत. आजच्या स्थितीत देशात काय किंवा परदेशातही आटणी व्यवसायात दुष्काळी भागातीलच लोक आहेत. साताऱ्यातील माण खटाव तालुक्यातील अनेकांनी यात जम बसविला आहे. सांगली जिल्ह्यातील आटणी व्यावसायिक श्रीलंका, दुबईमध्येही कार्यरत आहेत. सोने-चांदीचा व्यवसाय शेकडो वर्षांपासून सुरू आहे. सोन्याच्या दागिन्याचा भल्याभल्यांना मोह आहे. सोन्यापासून दागिने बनविताना ते शुध्द करुन घ्यावे लागते. म्हणजेच त्याला सोने रिफायनरी म्हणतात. ग्रामीण भागात त्याला आटणी म्हणून ओळखले जाते. देशात किंवा परदेशातही आटणी व्यावसायिक पसरला आहे. हा व्यावसायिक हा फक्त दुष्काळी भागातील आहे. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव तालुका, सातारा जिल्ह्यात तर २०० च्यावर आटणी व्यावसायिक कार्यरत आहेत तर सातारा शहरात किमान ३० जण आहेत. आटणी व्यावसायिक मजुरीवर काम करतात. त्यांना टक्केवारीनुसार पैसे मिळतात. सोन्याची टक्केवारी काढणे, सोने शुध्द करणे यानुसार त्यांना पैसे मिळतात. आटणीच्या व्यावसायासाठी दगडी कोळसा, अ‍ॅसिड आणि नवसागर लागते. सातारा जिल्ह्यात असे कारागिर हजारभर आहेत. वर्ष, दोन वर्षांतून ते बंगालला जातात. आटणी व्यावसायिकांची काही प्रसिध्द गावे...आटणी व्यावसायात दुष्काळी तालुक्यातील अनेक गावे आहेत. या व्यावसायामुळे त्यांच्या गावांची नावे प्रसिध्द झाली आहेत. यामध्ये माण तालुक्यातील वरकुटे मलवडी, शेनवडी, महाबळेश्वरवाडी. खानापूर तालुक्यातील पारे, वेजेगाव, भूड, जाधववाडी, मंगरूळ, रेवणगाव, बेनापूर, बलवडी (खानापूर), चिंचणी. आटपाडी तालुक्यातील आटपाडी, करगणी, माडगुळे, तडवळे, नेलकरंजी. तसेच तासगाव ताुलक्यातील अनेक गावांतील लोक या व्यवसायात आहेत. एवढेच काय खानापूर तालुक्यातील काहीजण तर श्रीलंका, दुबई, अंदमान निकोबार येथे आटणी व्यावसाय करीत आहेत.