शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

खोल दरीत कोसळलेल्या कारचा चालक ‘फोटोसेशन’मुळे वाचला!

By admin | Updated: June 28, 2014 00:33 IST

खंडाळा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटातील चौथ्या वळणावर कार दोनशे फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला.

खंडाळा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटातील चौथ्या वळणावर कार दोनशे फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला. यावेळी ‘फोटो सेशन’साठी थांबलेल्या प्रवाशांमुळे खोल दरीत कोसळूनही प्रवाशाचा जीव वाचला.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीपाद प्रसाद सूर्यवंशी (रा. मोर्वे, ता. खंडाळा) हे खंडाळ्याहून साताऱ्याकडे (एमएच ११ ४१८४) मधून निघाले होते. त्यांची गाडी खंबाटकी घाट ओलांडत असताना कारवरील ताबा सुटला. त्यामुळे घाटातील चौथ्या वळणावर कार तब्बल दोनशे फूट दरीत कोसळली. त्याच वेळी दुचाकीस्वार पाठीमागून येत होते. ते घाटात फोटो काढण्यासाठी थांबले. यावेळी त्यांना ‘वाचवा-वाचवा’ असा आवाज ऐकू आला. त्यांना दरीत कार कोसल्याचे दिसले. त्यानंतर खंडाळा पोलिसांनी घाटात आपत्कालीन संपर्कासाठी लावलेल्या फलकावरील क्रमांकावरून दुचाकीस्वारांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर खंडाळा पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी कारचालकाला बाहेर काढून खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांना तातडीने उपचार मिळाल्याने प्राण वाचले. खंडाळा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (प्रतिनिधी)