शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाहने सावकाश चालवा; मोकाट जनावरे वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST

सातारा : सातारा शहरातील वाहनधारकांना सध्या मोकाट जनावरांचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरातील प्रमुख चौक, भाजीमंडई व ...

सातारा : सातारा शहरातील वाहनधारकांना सध्या मोकाट जनावरांचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरातील प्रमुख चौक, भाजीमंडई व बाजारपेठेत मोकाट जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. मोकाट जनावरांचे कोणीच वाली नसल्याने या जनावरांचे करायचे काय? तक्रार कोणाकडे करायची? असा प्रश्न वाहनधारकांना नेहमीत पडत असतो.

मोकाट जनावरे खाद्याच्या शोधार्थ शहरात मुक्तसंचार करतात. अशा जनावरांना पकडून कोंडवाड्यात ठेवण्याची मागणी नागरिकांमधूून अनेकदा करण्यात आली आहे; परंतु पालिका प्रशासनाने ही बाब अद्याप गांभीर्याने न घेतल्याने भटक्या जनावरांचा वावर वाढतच चालला आहे.

(चौकट)

मोकाट जनावरांचा वाली कोण?

शहरातील मोकाट श्वान, गायी, म्हशी यांना पकडून कोंडवाड्यात अथवा शहरापासून दूर सोडणे गरजेचे आहे. याबाबत पालिका प्रशासनाने उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे; परंतु पालिका ही बाब गांभीर्याने घेत नसल्याने मोकाट जनावरांना कोणी वालीच उरलेला नाही.

(चौकट)

वर्षभरात एकही कारवाई नाही

सातारा शहरात भटक्या गायी, म्हशी, श्वान, तसेच गाढवांची संख्या वाढू लागली आहे. काही शेतकरी आपली पाळीव जनावरेही खाण्यासाठी मोकळी सोडून देतात. या जनावरांचा मोठा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागतो. असे असूनही पालिका प्रशासनाकडून वर्षभरात एकही ठोस कारवाई करण्यात आली नाही.

(चौकट)

या मार्गावर वाहने जपून चालवा

राधिका रस्ता

बाजार समिती परिसर

राजपथ

जुना मोटार स्टॅँड

राजवाडा-समर्थ मंदिर मार्ग

(कोट)

पालिका ठोस पावले उचलणार

शहरात मोकाट जनावरांची संख्या वाढू लागली आहे. ही जनावरे वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. शिवाय अपघातही होत आहेत. पालिकेकडून भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण केले जाणार आहे. इतर भटक्या जनावरांबाबतही योग्य त्या उपाययोजना केल्या जातील.

-प्रताप राठोड, आरोग्य निरीक्षक

फोटो : २२ जावेद खान