शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

माणमधील चार गावांमध्ये पाणीच पाणी !

By admin | Updated: October 14, 2016 00:33 IST

जलयुक्तची जादू : पांढरवाडी, कोळेवाडी, गोडसेवाडी, दिवडी गावांमध्ये साखळी बंधाऱ्यांचा फायदा

 दहिवडी : कायम दुष्काळी समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यात जलयुक्तच्या माध्यमातून मोठी क्रांती होत आहे. त्या क्रांतीचे फलित म्हणजे तालुक्यातील पांढरवाडी, कोळेवाडी, गोडसेवाडी, दिवडी या गावांमध्ये सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. सुरुवातीला या गावांमध्ये साखळी सिमेंट बंधारे १७ ठिकाणी झाले. त्यानंतर शासनाने ‘जलयुक्त शिवार’ कल्पना मांडली. या चारही गावांतील चांगले लोक एकत्र आले. सर्वांनी मिळून ३५ ते ४० ठिकाणी मातीचे बंधारे उभे राहिले आणि ऐन दिवाळीत टँकरचे पाणी पिणारे गाव अक्षरश: स्वयंपूर्ण झाले व चारही गावांमध्ये किमान १५ मेपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे. या गावाने डोंगरमाथ्यावर करोडो बियांचे टोकण केले. हनुमान विद्यालय निढळ, न्यू इंग्लिश स्कूल महिमानगड व जिल्हा परिषद शाळा यांच्या सहकार्याने करंवद, साग, लिंब, करंज, सीताफळ या वृक्षांची लागवड केली आहे. दिवडी येथे ५० एकर क्षेत्रामध्ये वनराई निर्माण केली आहे. आंबा, नारळ यासह अनेक झाडे असून, रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली आहे. वाहणारे पाणी जागीच खड्ड्यात साठवले आहे. डोंगराला चर काढून पाणी अडविल्याने स्वच्छ पाणी बंधाऱ्यामध्ये येत आहे. या कामात कोकणचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, अभिनेते सयाजी शिंदे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, कृषी विभाग, तहसीलदार यांनीही महत्त्वपूर्ण मदत केली आहे. गावात ३५ ते ४० बचतगट स्थापन झाले असून, अनेक राजकीय सामाजिक मंडळी या गावाला आवर्जून भेट देत असल्याने ग्रामस्थांचा लोकसहभाग दिवसेंदिवस वाढ आहे. (प्रतिनिधी)