शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

एका संशयिताचे रेखाचित्र जारी

By admin | Updated: September 13, 2015 22:17 IST

सामूहिक अत्याचार प्रकरण : ठोस धागेदोरे अद्याप पोलिसांच्या हाती नाहीत

सातारा : सातारा-कोरेगाव रस्त्यावरील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत सुरक्षारक्षकाच्या झोपडीवर शुक्रवारी पडलेला दरोडा आणि पतीदेखत पत्नीवर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणातील एका संशयिताचे रेखाचित्र पोलिसांनी रविवारी जारी केले. दरम्यान, या प्रकरणी ठोस धागेदोरे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.बांधकामावर निगराणी करण्यासाठी नेमलेल्या दाम्पत्यातील पत्नीवर तीन दरोडेखोरांनी पतीच्या डोळ्यांदेखत सामूहिक अत्याचार केला होता. वीस ते पंचवीस वयोगटातील दहा ते बारा दरोडेखोर दाम्पत्याच्या झोपडीत शुक्रवारी पहाटे घुसले होते. खिडकीच्या काचा फोडून ‘घरात असेल ते द्या, अन्यथा तुम्हाला सोडणार नाही,’ असे म्हणत हाताला लागेल ते लुटून नेले. तसेच पतीला जिवे मारण्याची धमकी देऊन दरोडेखोरांनी पत्नीवर सामूहिक अत्याचार केला. शुक्रवारी सकाळी ही माहिती पोलिसांना समजल्यावर त्यांनी नाकेबंदी केली; मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही.दरम्यान, पीडित महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी एका दरोडेखोराचे रेखाचित्र तयार करवून घेतले आहे. या इसमाने तोंडावरील मास्क काही वेळासाठी काढला होता. त्यामुळे अंधार असूनही त्याचा चेहरा पीडितेला थोड्या वेळासाठी दिसला होता. त्या वर्णनावरून हे रेखाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून दरोडेखोरांचा कसून शोध घेतला जात असून, पोलिसांची सात पथके शोधासाठी ठिकठिकाणी रवाना झाली आहेत. दरम्यान, तपासासाठी उपयोगी पडणारा तांत्रिक ‘डाटा’ रविवारी पोलिसांना उपलब्ध होऊ शकला नाही. तो उपलब्ध झाल्यावर तपासाला आणखी गती मिळेल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)कुठे गेले मानवाधिकारवाले? -दरोडा आणि सामूहिक अत्याचाराचे प्रकरण शहरापासून इतक्या जवळ घडूनही दोन दिवस कोणत्याही स्वयंसेवी संस्थेला पीडित महिलेची अद्याप दखल घ्यावीशी वाटलेली नाही. पीडित कुटुंबाला ना मानवाधिकारवाल्यांनी भेट दिली, ना महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी. एरवी छोट्या-मोठ्या प्रसंगांमध्ये ‘धावून येणारे’ संबंधित पीडितेला भेटलेही नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.सीसीटीव्हीची कमतरतासंशयितांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडे ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज हा एक महत्त्वाचा धागा आहे. घटनेच्या दिवशी पाऊस असल्याने तसेच रात्रीच्या वेळी वाहनांचे प्रखर दिवे आणि अन्य कारणांमुळे अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये स्पष्ट धागा अद्याप सापडलेला नाही. दरम्यान, शहराच्या प्रवेशद्वारांवर उच्च क्षमतेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता या तपासात पोलिसांना जाणवत आहे. खिंडवाडी, लिंबखिंड, मोळाचा ओढा, बाँबे रेस्टॉरंट चौक, वाढे फाटा, बोगदा अशा ठिकाणी कॅमेरे बसविण्याची गरज व्यक्त होत आहे.