रशीद शेख ल्ल औंध शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून उदयास आलेल्या दूध व्यवसायाने मागील काही दिवसांत चांगले बस्तान बसविले आहे. या जोडधंद्याचे रूपांतर व्यवसायात होऊन शेकडो बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. मात्र, काही दिवसांपासून सातत्याने दुधाचा खरेदी दर कमी तर पशुखाद्याचे दर वाढत आहेत. काही महिन्यांपूर्वी २६ रुपये लिटर मिळणारा दर आता १६ रुपयांवर येऊन ठेपल्याने दूध व्यवसाय आर्थिक संकटात सापडला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गायींच्या सरासरी १ लिटर दूधनिर्मितीचा विचार करता वैरण, पशुखाद्य, औषधे, मजुरी यांचा खर्च वजा जाता हाती काहीच शिल्लक राहत नाही. अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून गोठे बांधले आहेत. परराज्यातून दुधाळ गायी, म्हशी आणल्या आहेत आणि आता दुधाचे दर कमी झाल्याने त्यांच्या आशेवरच पाणी फिरले आहे. शिवाय राज्यात गोहत्या बंदीचा कायदा लागू झाल्याने दूध न देणाऱ्या जनावरांचा प्रश्नही गंभीर बनला आहे. सध्या देशी जनावरे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. दूध दर, पोषक चाऱ्याची कमतरता, पशुखाद्याचे वाढते भाव यामुळे दूध देणारी जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांसाठी जिकिरीचे बनले आहे.
दरातील चढ-उताराचे
By admin | Updated: May 11, 2015 00:48 IST