शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कराडची बाजार समिती राजकीय भक्ष होवू देऊ नका : पृथ्वीराज चव्हाण

By प्रमोद सुकरे | Updated: April 9, 2023 17:54 IST

लोकनेते विलासराव पाटील रयत पॅनेलच्या कार्यकर्त्यांच्या मेळावा.

"मी सहकारातील निवडणुकीत सहसा सहभाग घेत नाही. परंतु राज्यात अनपेक्षित सत्तांतर झाले. यामुळे सहकारी क्षेत्रात अपप्रवृत्ती डोकावू पाहत आहेत. केंद्र व राज्याची चौकशी यंत्रणा राजकीय नेत्यांना त्रास देत आहेत. यातून सहकारी क्षेत्रात त्यांना सत्ता घ्यायची आहे. हा केंद्र व राज्यातील पॅटर्न बघून मी कराड शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी राहिली पाहिजे. तिचे राजकीय भक्षण करू नये, यासाठी मी थेट निवडणुकीत उतरलो आहे. या निवडणुकीतील विजय विलासराव  पाटलांना श्रद्धांजली ठरेल," असे प्रतिपादन आमदार  पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार प्रारंभ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.उदयसिंह पाटील - उंडाळकर, तसेच पॅनेलचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, खरेतर कराड बाजार समिती बिनविरोध व्हायला हवी होती. ही संस्था वाचवली पाहिजे. या भावनेतून आम्ही एकत्र आलो आहोत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून निवडणूक विलास काकांना श्रद्धांजली ठरणार आहे. सार्वजनिक निवडणुकीत यश मिळत नसल्याने प्रतिगामी विचार सहकारात येवू पाहत आहे. देशात जे काही चालले आहे. त्याची अप्रत्यक्ष उजळणी होणार आहे. सर्वसामान्यांचे हकक, अधिकार धोक्यात आले आहेत. याचा विचार या निवडणुकीत केला पाहिजे. बाजार समितीची निवडणूक गांभीर्याने घेवून आपण विजयी होवू.

अजितराव पाटील - चिखलीकर म्हणाले, लोकनेते विलासराव पाटील - उंडाळकर यांनी कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजारासाठी पन्नास एकर जमीन आरक्षित केली. विलासकाकांचे बाजार समितीमधील योगदान महत्त्वाचे आहे. मग या निवडणुकीत गाय रुतली आणि वासरू पुढे निघून गेले, ही अवस्था विरोधकांमध्ये आहे. 

तर दररोज १०० बिसलरीच्या बॉटल्या लागतीलया निवडणुकीत सरंजामदारांचे पॅनेल निवडून दिले तर बाजार समिती दररोज बिसलरीच्या शंभर बाटल्या आणाव्या लागतील. कारण त्यांना साधे पाणी चालत नाही अशी टीका अजितराव पाटील चिखलीकर यांनी नाव न घेता डॉ. अतुल भोसले यांच्यावर केली.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण