शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक कार्यक्रमातून सव्वा लाखाची देणगी

By admin | Updated: April 19, 2017 15:02 IST

म्हावशी प्राथमिक शाळेच्या विकासासाठी मोठी मदत होणार

आॅनलाईन लोकमतखंडाळा (जि. सातारा), दि. १९ : प्राथमिक शाळांच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी शिक्षकांची कायम धडपड सुरू असते. सध्या गावोगावच्या यात्रांचा काळ चालू आहे. या यात्रांमधून मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. अशातूनच म्हावशी येथील शाळेला सांस्कृतिक कार्यक्रमातून चक्क सव्वा लाखाची बक्षीस रुपाने देणगी मिळाली आहे. त्यामुळे शाळेचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे. म्हावशी, ता. खंडाळा येथील प्राथमिक शाळेने वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम गावच्या यात्रेनिमित आयोजित केला होता. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या बहारदार गीतांवरील बालकलाकारांच्या नृत्याविष्काराने उपस्थित ग्रामस्थांची मने जिंकली. आपल्याच मुलांचे कौतुक करताना ग्रामस्थांनी ही तब्बल १ लाख २७ हजार रुपयांचे बक्षीस देत मुलांवर कौतुकाचा वर्षाव केला. तालुक्यात आजपर्यंतच्या कार्यक्रमात म्हावशी शाळेने उच्चांक प्रस्थापित केला आहे. मिळालेल्या या मदतीतून शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करणे सहज शक्य होणार आहे. शाळेने घेतलेल्या पोवाडे गायन, किल्ले स्पर्धा, हस्ताक्षर, चित्रकला, स्पेलिंग पाठांतर अशा विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ घेण्यात आला. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी गजानन आडे, सरपंच स्वाती माळी, उपसरपंच विठ्ठल राऊत आदी प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)