शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

देशी-विदेशी अन् बिअरबार परवान्यांवरून खडाजंगी

By admin | Updated: December 3, 2015 23:47 IST

विंग ग्रामसभा : ३० डिसेंबरला महिलांच्या सभेत होणार निर्णय

विंग : गाव तसेच परिसरात वाढत असलेल्या देशी-विदेशी दुकानांबाबत तसेच बिअरबारच्या परवान्याबाबत ग्रामस्थांमध्ये खडाजंगी झाली. विंग ता. कऱ्हाड येथे सरपंच शंकरराव खबाले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. यावेळी झालेल्या ग्रामसभेत विविध समित्यांची पुनर्रचना करण्यात आली. ग्रामसभेत सदस्यांकडून मांडण्यात आलेले विषय सर्वांच्या सहमतीने सोडविण्यात आले. परंतु देशी-विदेशी आणि बिअरबारच्या परवान्याच्या विषयाला ग्रामस्थांनी विरोध दर्शविला. बिअरबारचा विषय सभेत उपस्थित होताच कॉ. जे. एस. पाटील, अशोक यादव आणि जगन्नाथ घोरपडे यांनी त्याला विरोध केला. उपस्थित ग्रामसभेत हा ठराव सुरूवातीला ‘ना हरकत दाखला’ न देण्याबाबत मंजूर झाला होता. परंतु याला दाखला द्यायचा नसेल तर आहे तो बार बंद करा अशी सभेदरम्याने ग्रामस्थांनी सूचना केली. देशी विदेशी दुकांनासह बिअरबारला परवानगी द्यावी तसेच याबाबत ना हरकत दाखला न द्यावा या दोन्ही वेगवेगळे विषय असताना ते एकत्र केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला. सभेदरम्यान ग्रामस्थांमध्ये व अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. त्यावेळी सरपंच शंकरराव खबाले यांनी सभेतील वातावरण व्यवस्थित हाताळून ३० डिसेंबरला महिलांची सभा बोलावून निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.गावातील ३५० पेक्षा जास्त लोकांना स्वस्त धान्य दुकानदाराकडून लाभ मिळत नसल्याने दुकानदारावर कारवाई करण्यात यावी, अशी ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आली. गावातील ग्रामस्थांना न्याय मिळण्यासाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांमार्फत तहसिलदारांना निवेदन देवून चालू परवाने रद्द करावे. तसेच नवीन परवाना विंग विविध कार्यकारी सेवा सोसायटीला द्यावा असे सर्वानुमते मंजूर करण्यात आले. विंग गावाला इरिगेशनचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते परंतु चौपदरीकरणाच्या कामात पाईपलाईन फुटून नुकसान झाले आहे. यामुळे ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ठेकेदाराने फुटलेली पाईपलाईनचे काम न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी ग्रामस्थांमधून देण्यात आला आहे. (वार्ताहर) विंग गावाला एक परंपरा व संस्कृती आहे. यामुळे तालुक्यात गावाला एक प्रतिष्ठा आहे. या प्रतिष्ठेला कुठेही गालबोट न लागता ग्रामस्थ योग्य तोच निर्णय घेतील.- हेमंत पाटील, ग्रामस्थ, विंग