शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुक्या वासरांना ‘मद्या’ची अन् तरुणाईला ‘डॉल्बी’ची झिंग..!

By admin | Updated: July 19, 2016 23:52 IST

वाईतील प्रकार : बेंदरादिवशी श्रमदेवतेची विकृत मनोरंजनासाठी पिळवणूक

वाई : आपल्या संस्कृतीत बेंदूर सणाला मोठे महत्त्व आहे़ बैल म्हणजे कष्टाचे प्रतीक. अशा श्रमदेवतेची पूजा करण्याचा हा दिवस. मात्र, वाई शहरात या श्रमदेवतेची विकृत मनोरंजासाठी चक्क पिळवणूक करण्यात आली. काही युवकांनी लहान-लहान वासरांना मद्य पाजून त्यांची मिरवणूक काढली. तर दुसरीकडे युवकांनाही ‘डॉल्बी’ची चांगलीच झिंग चढली होती. हे विदारक चित्र पाहून नागरिकांसह अनेक शेतकरी अचंबित झाले.बैलांप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बळीराजा बेंदूर हा सण आत्मीयतेने साजरा करतो़ परंतु वाई शहरात या प्रतिमेला व पावित्र्याला फाटा दिल्याचे चित्र दिसत आहेत़ बैलांच्या मिरवणुकीत लहान वासरांनाही सहभागी करण्यात आले होते. या वासरांना भर चौकात काही अतीउत्साही तरुणांकडून मद्य पाजण्यात आले. मुक्या प्राण्यांबरोबर केवळ मनोरंजनासाठी करण्यात आलेल्या या विकृत प्रकाराने मात्र नागरिक अचंबित झाले. एवढेच नव्हे तर बैलांचा आदर करण्याऐवजी त्यांची डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजावर तरुणाई मनसोक्त थिरकली असली तरी मुक्या जनावरांची मात्र छळवणूकच करण्यात आली. वाई शहरात बैलांच्या मिरवणुकीत बैल कमी व डॉल्बीच्या तालावर नाचणारे कार्यकर्ते जास्त असे चित्र पाहावयास मिळाले. (प्रतिनिधी)