शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नावजीनाथांच्या किवळमध्येही डॉल्बी पराभूत्

By admin | Updated: June 1, 2015 00:15 IST

आव्वाज गावाचा... ..नाय डॉल्बीचा !

मसूर : मसूरच्या पूर्वेस सुमारे चार किलोमीटर अंतरावर किवळ (ता. कराड) गाव आहे. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या ओढाजोड प्रकल्पामुळे व पाणलोटची अनेक कामे झाल्यामुळे सध्या या गावाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. ‘लोकमत’ने सुरू केलेल्या लोकचळवळीत सहभागी होऊन आता गावकऱ्यांनी एक पाउल पुढे टाकले असून, डॉल्बीबंदीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेतल्यापासून गावात कुठेही डॉल्बीचा निनाद ऐकायला येत नसल्याने आबालवृध्दांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.किवळ गावास महाराष्ट्रातून अनेक गावांतून लोक भेटी देऊन येथील पाणलोटच्या कामाचे कौतुक करत आहेत. या गावातील ग्रामस्थांनी लोकसहभाग व शासनाच्या मदतीने पाणलोटची अनेक कामे केली असून, एकेकाळी टँकरग्रस्त असणारे हे गाव टँकरमुक्त केले आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत श्री जोतिर्लिंगाचे निस्सीम भक्त संत नावजीनाथांचे किवळ म्हणून या गावाची ख्याती महाराष्ट्रभर आहे. लग्नात डॉल्बीेच्या तालावर तरूणांच्या बरोबरीने वयोवृध्द आणि शेवटी नवरा-नवरीही ठेका धरत असत. डॉल्बीच्या आवाजाने घरांतील भांडी खाली पडत. डॉल्बीच्या तालावर तरुणाई बेधुंद होऊन थिरकत असताना संपूर्ण गाव निमूटपणे सर्व सहन करीत असत. पण ‘लोकमत’च्या चळवळीमुळे मानसिकता बदलू लागली आहे. गुळुंबप्रमाणे आपलेही गाव डॉल्बीमुक्त करण्यासाठी किवळच्या ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. (वार्ताहर)शासन व लोकसहभागातून गावामध्ये अनेक समाजोपयोगी कामे झाली आहेत. आता एक पाउल पुढे टाकून वृध्दांना, आजारी व्यक्तींना त्रास होऊ नये म्हणून गावात डॉल्बीबंदीचा निर्णय घेतला आहे. - कल्पना साळुंखे, सरपंच, किवळसंत नावजीनाथांमुळे गावाची महाराष्ट्रात एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे सर्वजण मिळून आदर्श गाव होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यातूनच आम्ही डॉल्बीबंदीचा निर्णय ग्रामसभेत घेतला आहे. - सुनील साळुंखे, उपसरपंच, किवळ