शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मूकबधिर चिमुकलीवर कुत्र्यांचा झुंडीने हल्ला

By admin | Updated: February 18, 2016 21:15 IST

शाहूनगरमधील घटना : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाचा मुद्दा ऐरणीवर

सातारा : अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकलीवर चार ते पाच कुत्र्यांनी झुंडीने हल्ला केल्याची घटना शाहूनगर परिसरात घडली. मुलगी मूकबधिर असल्यामुळे मदतीसाठी ओरडूही शकली नाही. त्यामुळे या हल्ल्यात तिला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या असून, तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शहरातील वाढती भटकी कुत्री आणि त्यांच्या उपद्रवाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.श्रावणी बंडू पवार असे या चिमुकलीचे नाव आहे. चारभिंती टेकडीच्या मागे, शाहूनगर भागात हिलटॉप गार्डन हाउसिंग सोसायटीत ती राहते. तिचे वडील फ्लेक्स फलक लावण्याचे काम करतात. समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या मूकबधिर विद्यालयात इयत्ता पहिलीत शिकणारी श्रावणी घराच्या परिसरात मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान खेळत होती. ही वसाहतच डोंगरउतारावर आहे. उतारावरील झाडीजवळ श्रावणी असताना डोंगरउतारावरून चार-पाच कुत्री वेगाने आली आणि त्यांनी श्रावणीवर हल्ला चढविला. श्रावणी ओरडूही शकत नसल्यामुळे तिला मदत मागता आली नाही. आसपासही कोणी नव्हते. अखेर त्याच कॉलनीत पवार यांच्या घरासमोर राहणाऱ्या श्रद्धा धनंजय कुंभार यांना हा प्रकार दिसला. कुत्र्यांच्या गराड्यात लहानगी श्रद्धा असल्याचे दिसताच हातात काठी आणि दगड घेऊन त्या मदतीला धावून आल्या. कुत्र्यांना हाकवून त्यांनी श्रावणीला उचलून घेतले, तेव्हा ती रक्तबंबाळ झाली होती. कुत्र्यांनी तिच्या मांडीला आणि पोटाला खोलवर चावे घेऊन लचके काढले होते. श्रद्धा कुंभार यांनी श्रावणीला त्वरित तिच्या घरी पोहोचविले आणि तिच्या आईला हा प्रकार सांगितला. नंतर तातडीने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्रावणीवर उपचार सुरू असून, प्रकृती सुधारत आहे. (प्रतिनिधी)कुत्र्यांचा आवाज आल्याने माझे लक्ष गेले तेव्हा चार-पाच कुत्री श्रावणीचे चावे घेत होती. कुत्र्यांनी डोंगर उतारावरून श्रावणीला सुमारे पंधरा ते वीस फूट खाली फरफटत आणले होते. दगड मारून, काठी उगारून मी कुत्र्यांना हाकलवले आणि श्रावणीला उचलून तिच्या आईला हाका मारल्या. आमची घरे समोरासमोर आहेत. ही घटना घरापासून सुमारे पन्नास फुटांवर घडली.- श्रद्धा धनंजय कुंभार