शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वरून डॉक्टर... आतून मात्र कार्यकर्ता !

By admin | Updated: October 4, 2016 01:02 IST

समाज बांधवांसाठी आरोग्यसेवा : स्वयंसेवकांनी घडविले माणुसकीचे दर्शन

सातारा : महामोर्चात सर्वच क्षेत्रातील समाजबांधव उतरल्याचे सोमवारी दिवसभर पाहायला मिळत होते. प्राध्यापक, वकील अन् अभियंत्यांसोबत डॉक्टरही यात होते. एक डॉक्टर तर चक्क आतमध्ये स्वयंसेवकाचा काळा टी-शर्ट घालून वर पुन्हा वैद्यकीय पेशाचा पांढरा कोट वापरत असल्याचे पाहून एकजण अनाहूतपणे बोलून गेला, ‘यालाच म्हणतात वरून डॉक्टर... आतून मात्र अस्सल कार्यकर्ता.’ आरोग्य पथकांची कार्यतत्परतामहामोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरात जागोजागी आरोग्य पथके तैनात करण्यात आली होती. जिल्हा रुग्णालय, आर्यांग्ल रुग्णालय यासह विविध रुग्णालयांतील आरोग्य पथके रुग्णवाहिकेसह महामोर्चा मार्गावर ठिकठिकाणी नियुक्त करण्यात आली होती. ज्यांना अत्यवस्थ वाटत होते अशांना पथकांमार्फत वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली.महावितरणची ‘अखंडित’ सेवामराठा क्रांती महामोर्चात वीजपुरवठा खंडित होऊ नये व कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी महावितरण विभागाच्या वतीने महामोर्चादिनी खबरदारी घेण्यात आली. सातारा शहराला वीजपुरवठा करणाऱ्या प्रत्येक डीपीवर एका कर्मचाऱ्याला नियुक्त करण्यात आले होते. जर वीजपुरवठा खंडित झाला अथवा काही बिघाड आल्यास तातडीने दुरुस्ती करण्याचे काम महावितरणच्या चार जंक्शनमधील सुमारे १२५ कर्मचाऱ्यांकडून केले जात होते. या कामासाठी सर्व कर्मचाऱ्यांना महामोर्चाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच दि. २ आॅक्टोबर रोजी अत्यावश्यक सूचना करण्यात आल्या होत्या. चेहऱ्यावरही लिहिले मी मराठा ! सातारा शहरात मराठा महामोर्चाची सगळीकडे क्रेझ होती. अनेक युवकांनी हेअर स्टाईलही बदलली होती. काहीनी ‘मी मराठा’ असं डोक्यावर कोरलं होतं तर काहीनी चक्क चेहऱ्यावर नाव लिहिलं होते. असे युवक महामोर्चामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते. तर अनेकांच्या हातात भगवे झेंडे होते.