शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: ओंड येथे डॉक्टरने दवाखान्यातच संपवले जीवन, कारण अस्पष्ट 

By प्रमोद सुकरे | Updated: July 31, 2024 14:15 IST

कराड : ओंड (ता. कराड ) येथील डॉ. हेमंत प्रभाकर रेळेकर (वय ५०) यांनी आज, बुधवारी सकाळी आपल्या दवाखान्यातच ...

कराड : ओंड (ता. कराड ) येथील डॉ. हेमंत प्रभाकर रेळेकर (वय ५०) यांनी आज, बुधवारी सकाळी आपल्या दवाखान्यातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना समजताच वैद्यकीय क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे.कराड तालुक्यातील बाजारपेठेचे गाव म्हणून ओंड गावची ओळख आहे. या ठिकाणी डॉ. हेमंत रेळेकर व त्यांच्या पत्नी डॉ.दिपा रेळेकर हे अनेक वर्षांपासून आपला वैद्यकीय व्यवसाय करत होते.ओंडोशी रस्त्यावर त्यांचे रेळेकर हॉस्पिटल होते.तर पहिल्या मजल्यावर ते आई, पत्नी, मुलगा,मुलगी असे परिवारासह रहात होते.घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी डॉ. हेमंत रेळेकर हे आपल्या दवाखान्यात आले. परंतु परत वर घरात बराचवेळ परतले नाहीत. कुटुंबीयांनी दवाखान्यात पाहिले असता त्यांनी दवाखान्यातलीच एका खोलीमध्ये गळफास घेतल्याचे समोर आले. दरम्यान सदरची घटना समजतात दुपारी १२च्या सुमारास कराड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  मात्र आत्महत्या नेमकी कशामुळे केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdoctorडॉक्टर