शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आपापसातील भांडणे दूर ठेवून एकत्र काम करा

By admin | Updated: July 2, 2016 23:53 IST

रामराजे : राष्ट्रवादी तालुका मेळाव्यात ‘मिशन इलेक्शन’ची घोषणा

सातारा : ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांची पेरणी गावागावामध्ये झाली पाहिजे. आता सुरुवातीचा काळ राहिलेला नाही. सोशल मीडियाच्या जमान्यात तरुणांपर्यंत पवारांचे विचार पोहोचवून त्यांना प्रवाहात आणले पाहिजे. आगामी निवडणुका वेगळ्या आहेत. आत्तापर्यंत सत्तेत राहून निवडणुका जिंकल्या. आता पहिल्यांदाच सत्तेबाहेर राहून निवडणूक लढायची असून, जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद कायम ठेवण्यासाठी आळस झटकून, आपसातील भांडण विसरून कामाला लागावे,’ असा आदेश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंंबाळकर यांनी दिला. दरम्यान, ‘आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत सातारा तालुक्यात पुन्हा राष्ट्रवादीचीच सत्ता आणू,’ असा निर्धार आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे आयोजित सातारा तालुका मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, पक्ष निरीक्षक सुरेश घुले, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती सतीश चव्हाण, महिला व बाल कल्याण समिती सभपती वैशाली फडतरे, सदस्य राजू भोसले, जितेंद्र सावंत, किरण साबळे-पाटील, पंचायत समिती सभापती कविता चव्हाण आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) कोणतेही आव्हान नेस्तनाबूत करू : शिवेंद्रसिंहराजे भोसले ‘पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार तालुकानिहाय मेळावे होत आहेत. सातारा जिल्हा आणि सातारा तालुका हा त्यांच्या विचाराने राष्ट्रवादीशी बांधला गेलेला आहे. दिवंगत भाऊसाहेब महाराजांनी सातारा तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष उभा केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता एकवटला की कोणतंही आव्हान आम्ही नेस्तनाबूूत करू, याची मला खात्री आहे,’ असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी स्पष्ट केले. सरकारबद्दल जनतेत प्रचंड चीड : शशिकांत शिंदे ‘माझ्या पहिल्या विजयात दिवंगत अभयसिंहराजे यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पश्चात आ. शिवेंद्रसिंहराजे सातारा तालुक्याची धुरा तितक्याच ताकदीने सांभाळत आहेत. आपला बालेकिल्ला काल होता, आज आहे आणि कायम राहणार आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल चीड, नाराजी आहे. कट कारस्थाने करून सहकार मोडीत काढण्याचे प्रयत्न सरकारचे आहेत.’