शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेती माल विकण्याची करू नका घाई

By admin | Updated: December 23, 2015 01:31 IST

जिल्हा बँकेचे अवाहन : नाबार्ड,ओरिगो अन् जिल्हाबॅकेकडून होणार शेतकऱ्याला आर्थिक मदत

वाठार स्टेशन : कर्जात अडकलेला शेतकरी कर्ज परत फेडण्यासाठी नेहमीच शेतातील माल विकण्याची घाई करतो. पर्यायाने बाजारपेठेत दर नसला तरी हा माल काडीमोल किमतीत विकण्याची त्याची तयारी असते; परंतु आता शेतकऱ्याचा हा शेतीमाल गावातच असलेल्या विकास सेवा सोसायट्यांंच्या गोडावूनमध्ये ठेवून त्या शेतीमालावर ७५ टक्के रक्कम घेऊ शकणार आहेत. शिवाय आपला शेतीमाल जेव्हा बाजारपेठेत दर मिळेल त्या वेळी विकू शकणार आहेत, ही किमया आता जिल्हा बँक,नाबार्ड आणि ‘ओरिगो’ कमोडेटीज यांनी वेअरहाऊस रिसिप्ट फायनांंन्स या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १५ हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.या कराराद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वेअरहाऊस रिसिप्ट फायनांन्स देण्याबाबतची योजना राबविण्याचा निर्धार जाहीर केला आहे.शेतीत उत्पन्न काढल्यानंतर शेतकरी लगेच माल विकण्याची घाई करत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने आपला माल व्यापाऱ्यांना द्यावा लागतो. कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे खुर्द सोसायटीच्या कार्यालयात या योजनेबाबत नुकताच शेतकरी जागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने,व्यवस्थापक डी.जी पोपळे,आर. के गायकवाड,ओरिगोचे निकम,डी.जी. ओकाटे,संदीप भिसे,मंगेश काटकर,भाग्यवंत कणसे,भागवत घाडगे, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कदम,विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष सुभाष कदम, उपाध्यक्ष योगेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.आर. के. गायकवाड म्हणाले, ‘महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पुढील सहा महिन्यांत शेतकऱ्यांमध्ये या प्रकल्पाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. आगामी हंगामामध्ये शेतकऱ्यांना साह्य करण्यासाठी पीएसीएसची स्थापना करण्यात येणार आहे. नाबार्डच्या माध्यमातून राज्यभर ‘वेअरहाऊस रिसिप्ट फायनांन्स’ ची उच्च क्षमता स्थापित करण्यावर भर देण्यात येणार आहे. हा उपक्रम २० पीएमसीएस स्थापन करण्यासह जवळपास १५ हजार शेतकऱ्यांंना साह्य केले जाणार आहे. (वार्ताहर) महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात सुरूवात शेतकऱ्यांना कच्चा माल,उत्पादन वितरण आदीमध्ये साह्य करण्याच्या हेतूने विविध व्यवसायामध्ये कार्यरत राहण्यासाठी पीएसीएसला प्रोत्साहित करण्यामध्ये सहभागी राहणार आहेत. पहिल्या टप्यातील आंध्रप्रदेश,तेलंगणा या राज्यातील यशानंतर महाराष्ट्रात दुसऱ्या टप्यातील सुरुवात झाली आहे.