शहरं
Join us  
Trending Stories
1
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
2
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
3
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
4
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
5
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
6
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
7
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
8
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
9
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
10
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
11
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
12
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
13
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
14
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
15
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
16
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
17
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
19
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
20
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश

कऱ्हाडात ‘थकबाकी नको; पण फ्लेक्स आवरा!’

By admin | Updated: March 1, 2016 00:10 IST

पालिकेची गांधीगिरी : संकलित कर भरण्यासाठी पालिकेत गर्दी; सोमवारी दिवसभरात सुमारे ६५ लाख वसूल

कऱ्हाड : कऱ्हाडातील सोमवार पेठेत रविवारी संध्याकाळी थकबाकीधारकांच्या नावाचे बोर्डही झळकले अन् सोमवारी दिवसभर पालिकेच्या वसुली विभागात लोकांनी पैसे भरण्यासाठी गर्दी केली.कऱ्हाड पालिकेच्या वतीने नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या थकबाकीधारकांच्या नावांमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पालिकेच्या वतीने आता गांधीगिरीच्या मार्गाने थकबाकीधारकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील सात प्रभागातील सुमारे ६ हजार ११६ हून अधिक थकबाकीधारकांकडून वर्षभर पैसे भरण्यासाठी केली जात असलेली टाळाटाळ आता नाहीशी झाली आहे. सोमवारी दुपारपर्यंत १९ लाखांची रोख रक्कम आणि १६ लाखांच्या आसपास चेक पालिकेत जमा झाले. तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण ६५ लाख रूपये थकबाकी पालिकेत जमा झाली. शहरातील घरपट्टी व पाणी पट्टीसह एकूण संकलित कर भरणाऱ्यांमध्ये डॉक्टर, व्यापाऱ्यांसह मेहरबानांच्याही नातेवाइकांचा समावेश आहेत. तर दुसरीकडे पालिकेच्या वतीने थकबाकीधारकांच्या नावांचे फलक तयार करण्यात येत आहेत. फलकावर आपल्या नातेवाइकांची नावे नाहीत ना! तशी असतील तर ती काढून टाकण्यासाठी सध्या मेहरबांनांकडून पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना फोनवरून विनवणी केली जात असल्याची चर्चा पालिका वर्तुळात ऐकावयास मिळत आहे. थांबा साहेब, आमची कराची रक्कम भरतो आमचे नाव टाकू नका, असे सांगत थकबाकीधारक आपल्या कराची रक्कम पालिकेत येऊन भरत आहेत. रविवारी सायंकाळी सोमवार पेठेतील थकबाकीधारकांची नावे सोमवार पेठेत पालिकेच्या वतीने लावण्यात आली होती. मात्र, फलक लावण्यात आले असल्याचे समजताच नागरिकांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसेच लावण्यात आलेल्या ‘त्या’ फलकावर आपल्या नातेवाइकांची नावे तर नाहीत ना अशी माहिती घेत काही मेहरबानांनी फोन करून मुख्याधिकारी व करवसुली प्रमुखांना विचारणा करण्यास सुरुवात केली. तसेच लावण्यात आलेले फलक काढण्यात यावेत, अशी विनवणी केली असल्याची चर्चा होती. (प्रतिनिधी) फलक काढण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव पालिकेच्या वतीने शहरातील थकबाकीधारकांच्या नावांचे फलक तयार करण्यात येत असल्याने त्यात आपले नाव येऊ नये म्हणून अनेकजण मेहरबानांकडे जाऊन त्यांच्याकडून अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याप्रमाणे अनेक मेहरबानही त्या-त्या पेठांतील करवसुली क्लार्कवर नावे न टाकण्यासाठी व फलक न लावण्यासाठी दबाव टाकत असल्याची चर्चा दबक्या आवाजात कर्मचारी वर्गातून केली जात आहे. त्यामुळे खरोखरच थकबाकीधारकांनी पथकाने राबविलेल्या मोहिमेची धास्ती घेतली असल्याचे निदर्शनास आले आहे.अशी झाली सोमवारी थकबाकी वसुली.. कऱ्हाड पालिकेच्या करवसुली विभागात सोमवारी थकबाकीधारकांनी संकलित कर भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यामध्ये