शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात लग्न ना वरात; बाजा वाजतोय दारात !

By admin | Updated: March 25, 2016 23:31 IST

पालिकेची युक्ती : थकबाकीदारांच्या दारात पोहोचला बँड; अनेकांचे धाबे दणाणले

कऱ्हाड : येथील पालिकेच्या वतीने थकबाकीदारांच्या करवसुलीसाठी वेगवगळे प्रयोग केले जात आहेत. सुरुवातीला कर भरण्याची विनंती करणारी प्रसिद्धीपत्रके त्यानंतर ध्वनिक्षेपकावरून आवाहन करण्यात आले. त्यातूनही दाद न देणाऱ्यांची नावे फ्लेक्सवर झळकली. त्याहीपुढे एक पाऊल टाकत आज वसुलीपथक थेट बँडपथक घेऊनच थकबाकीदारांच्या दारात पोहोचले. त्यामुळे थकबाकीदारांची त्रेधा उडाल्याचे पाहायला मिळाले. खरंतर पालिकेचे कर वेळेत भरणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे; पण त्याकडे अनेकजण दुर्लक्ष करताना दिसतात. पालिकेच्या वतीने आवाहन केल्यावरही त्याला प्रतिसाद देत नाहीत तेव्हा कर वसुलीसाठी पालिका व्यवस्थापनला काही नवीन कल्पना राबवाव्या लागल्या.काही महिन्यांपूर्वीच पालिकेच्या मुख्याधिकारी पदाची जबाबदारी विनायक औंधकर यांनी स्वीकारली. आल्याबरोबरच त्यांच्यासमोर कर वसुलीचा मोठा प्रश्न उभा होता; पण त्यांनी वसुली संदर्भात सुरुवातीपासूनच कडक भूमिका घेतली. सुरुवातीला काही जणांनी ‘नव्याचे नऊ दिवस’ म्हणत त्यांची खिल्ली उडविण्याचाही प्रयत्न केला; पण त्यांनी फ्लेक्सचा बडगा उचलल्यावर अनेकांची हवा गूल झाली. होळीचा सण झाल्याबरोबरच त्यांनी शुक्रवारपासून पालिकेचा बँडबाजा थकबाकीदारांच्या दारात धाडला त्यामुळे थकबाकीदारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. सकाळी १० वाजल्यापासून पालिका कर्मचाऱ्यांवर हा बँड थकबाकीदारांच्या दारात पोहोचत होता. अन बँड वाजला की, त्याची चर्चा होत होती. मुख्यबाजारपेठेत हा बँड वाजू लागल्याचे समजताच इतर पेठांतील माणसांनी पालिकेत धाव घेऊन कर भरणे पसंत केले. मात्र दिवसभर बँड गावात ठिकठिकाणी फिरतच होता. (वार्ताहर)