शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

निष्पापांना ठोकू नका !

By admin | Updated: July 19, 2015 23:36 IST

पोलीस अधीक्षकांचा इशारा : चोरीच्या अफवांमध्ये तथ्य नाही

सातारा : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांप्रमाणेच सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये चोर शिरल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. त्यांची खातरजमा केली असता त्यात तथ्य नसल्याचे आढळून आले असून, चोर समजून एखाद्या निष्पाप व्यक्तीला मारहाण केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिला आहे.कऱ्हाड, ढेबेवाडी, सांगली, शाहूवाडी येथे चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असल्याच्या अफवांचे लोण आता सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पसरले आहे. कोकरूड येथे एक आरोपी पकडला असून, ‘आम्ही तीन हजारजण आहोत. गावकऱ्यांनी गस्त घातली तरी आम्हाला जे करायचं ते आम्ही करू,’ असे सांगितल्याचीही अफवा आहे. संदेशांची माहिती द्याचोरट्यांबद्दल सोशल मीडियावरून पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता आलेल्या संदेशांबाबत नजीकच्या पोलीस ठाण्याला कळविण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे. गस्त घालताना अनोळखी व्यक्ती असल्यास पूर्ण शहानिशा करून पोलिसांना कळवावे; तसेच अफवा पसरविताना कोणी आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.कायदेशीर कारवाई होऊ शकतेसमाजकंटकांनी खोडसाळपणे पसरविलेलेल्या या अफवांमुळे गावकरी गस्त घालत असताना एखादी अनोळखी व्यक्ती, फिरस्ता, रस्ता चुकलेली व्यक्ती, अनोळखी पाहुणा अथवा मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तीला चोर समजून मारहाण होण्याची शक्यता आहे. यामुळे निष्पाप व्यक्तीच्या जिवाला अपाय होऊ शकतो आणि गस्त घालणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे अधीक्षकांनी म्हटले आहे.