शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नका वाटू दारू.. अन्यथा आम्ही ‘नोटा’ वापरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 22:44 IST

स्वप्नील शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : निवडणूक म्हटले की जेवण, दारू आणि पैसे असे जणू समीकरणच झाले ...

स्वप्नील शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : निवडणूक म्हटले की जेवण, दारू आणि पैसे असे जणू समीकरणच झाले आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला असताना मतदारांना विविध प्रलोभने दाखवून आकर्षित केले जाते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रणरागिणींनी यंदाची निवडणूक दारूमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. जावळी तालुक्यातील गांजे येथे झालेल्या महिलांच्या बैठकीत दारू वाटणाऱ्या उमेदवारावर नोटा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत जिल्ह्यातील सुमारे १०० महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्त्या उपस्थित होत्या.महिला राजसत्ता अभियानाच्या वतीने मतदान जागृती अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी महिला राजसत्ता अभियानच्या जिल्हा समन्वयक संगीता वेंदे, अ‍ॅवॉर्डच्या नीलिमा कदम, गांजेच्या सरपंच लक्ष्मी चिकणे, सावलीच्या सरपंच आशा देशमुख, बिभवीच्या सरपंच मंगल देशमुख, ग्रामपंचायत सदस्या संगीता परिहार, ऐकीवच्या सरपंच संगीता गोरे, सांगवीच्या सरपंच भाग्यश्री पवार व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.बैठकीच्या सुरुवातीला मतासाठी पैसे मागू नका, स्वत:चा हक्क विकू नका, आपला मतदानाचा हक्का बजावून गावामध्ये १०० टक्के मतदान होण्यासाठी सरपंच व महिलांनी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच जो पाजेल मतदाराला दारू, त्या उमेदवारांच्या विरुद्ध नोटा वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. दारूमुक्त निवडणूक या अभियानामुळे निवडणुकीत बेकायदा दारूचा वापर बंद होईल. त्याचबरोबर मतदार पूर्ण शुद्धीत आपल्या विवेकाने मतदान करतील. हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय असेल, असे सांगण्यात आले.दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाने निवडणुकीदरम्यान बेकायदा दारू विक्री व वाहतुकीवर प्रशासनाची करडी नजर आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी व छापा कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ११ मार्चपासून ७२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी ५९ जणांना अटक करण्यात आली असून, दारूसह २९ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आल्याची माहितीही उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने देण्यात आली. आगामी काळात अशी कारवाई सुरू राहणार आहे.महिलांनी काही घोषणा ठरविल्यावोट हमारा राज हमारा, मतदार गुलाम तर गाव गुलाम, मतदार गुलाम तर देश गुलाम, मतांचा लिलाव लोकशाहीवर घाव, लोकशाहीची खरी शान, शंभर टक्के मतदान मतांसाठी पैसे मागू नका, स्वत:चा हक्क विकू नका,माझं मतदान माझा स्वाभिमान. माझं मत माझी इज्जत, मतासाठी पैसे मागणार नाही. या घोषणांद्वारे सातारा जिल्ह्यात मतदारांमध्ये प्रबोधन करण्यात येणार आहे.