शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

खासगी डॉक्टरांची फी परवडेना

By admin | Updated: December 21, 2015 00:52 IST

मेंढपाळानाही डॉक्टरांना बोलावून वाट पाहत बसावे लागत आहे. अशा कारणांमुळे मेंढपाळासह, पशुपालकांची गैरसोय होत असून, ही गैरसोय दूर करण्याची मागणी

दुधेबावी : दुधेबावीमध्ये जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शेतकरी जादा प्रमाणात असल्याने येथील शेतकरी जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करताना दिसतो. मात्र, येथे पशुवैद्यकीय रुग्णालय नसल्याने खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागतो. खासगी डॉक्टरांची फी परवडत नाही.जनावरे आजारी पडल्यानंतर डॉक्टरांना बोलविल्यानंतर किमान शंभर रुपये फी द्यावी लागत आहे. आणि आजार मोठा असेल तर त्यापेक्षा जादा पैसे भरावे लागत आहेत. तसेच औषधांचे पैसे वेगळेच होत असल्याने मेंढपाळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी मेंढपाळानाही डॉक्टरांना बोलावून वाट पाहत बसावे लागत आहे. अशा कारणांमुळे मेंढपाळासह, पशुपालकांची गैरसोय होत असून, ही गैरसोय दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.दुधेबावीपासून सुमारे दोन-तीन किलोमीटर अंतरावर भाडकी खुर्द, वडले, तिरकवाडी, वांजाळे वस्ती, सोनवडी, अशी गावे असून, दुधेबावी येथे दवाखाना सुरू केल्यास गावातील शेतकऱ्यांना सुविधा मिळून त्यांचीही गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. खासगी डॉक्टर वेळेत न आल्यामुळे काहीवेळा जनावरे दगावण्याची घटना घडल्या आहेत. दुधेबावीपासून सुमारे पाच-सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गिरवी या गावामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना सुरू असून, गिरवीला जाण्यासाठी डोंगराळ भागामध्ये असल्याने शेतकरी जनावरे घेऊन गिरवीला जाऊ शकत नाहीत. (प्रतिनिधी)दुधेबावीमध्ये पशुवैद्यकीय दवाखाना होणे गरजेचे असून, तो होण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करून लवकरात लवकर शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी.- सुभाष सोनलवकर, दुधेबावीदुधेबावीमध्ये पशुवैद्यकीय दवाखाना होण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी प्रशासनानेही आम्हाला सहकार्य करावे. पशुवैद्यकीय दवाखाना सुरू न केल्यास आंदोलन करणार आहोत.- विकास सोनलवकर, रासप संघटक