शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
3
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
4
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
5
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
6
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 
7
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
8
Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट
9
"तो दहशतवाद नाही, त्यांचा संघर्ष", पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांचे 'नापाक' बोल; भारताबद्दल काय म्हणाले?
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
11
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
12
वॉरेन बफे यांचा ‘२० पंच कार्ड नियम’ तुम्हाला करेल श्रीमंत ! वाचा सविस्तर
13
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
14
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
15
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
16
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
17
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
18
Raymond Realty Stock Price: १००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
19
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
20
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...

बंधने घालू नका, आम्ही झाडे वाढवू

By admin | Updated: September 18, 2015 23:37 IST

स्थानिकांची मागणी : पठारावर जागोजागी वनकार्यालये उभारा--...पण अगोदर माणूसही वाचवा!

प्रमोद सुकरे/अरुण पवार ल्ल कऱ्हाड/ पाटण  --‘पर्यावरण व वन्यजीवांचे रक्षण करताना लोकांचे जीवन सुरक्षित राहिले पाहिजे. आमच्या भोवताली कोंडाळे करू नका. अगोदर लोकांना विश्वासात घ्या. त्यांचे रक्षण करा; बंधने घालू नका, मग आम्हीच झाडे वाढवू, असे आवाहन माजी मंत्री व विक्रमसिंह पाटणकर यांनी केले आहे.पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करणार कोण आणि नुकसानभरपाई कधी मिळणार, असा प्रश्न लोकांसमोर उभा आहे. लोकांनी नुकसानीची किंवा वन्यप्राण्याने हल्ला केल्याची खबर द्यायला पाटणला जायचे म्हटले तर ५० ते ६० किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. कोयना येथे वन्यजीव विभागाचे कार्यालय आहे. तेथील अधिकारी म्हणतात की, ‘जर वन्यप्राण्यांने हल्ला किंवा पिकांचे नुकसान केल्यास आम्ही भरपाई देतो.’ मात्र कोयनेच्या कार्यालयातील वनकर्मचारी सतत व्याघ्र प्रकल्पात असतात. कार्यालयमध्ये एकच कर्मचारी असतो. मग यांना शोधायचे कुठे, असा प्रश्न लोकांसमोर पडतो.स्थानिक जनतेच्या हितासाठी प्राधान्य देताना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाटण तालुक्यातील डोंगर पठारावर जागोजागी वन कार्यालये उभी करावी, तिथे मोठ्या प्रमाणात वनकर्मचाऱ्यांची उपलब्धतता करावी. म्हणजे स्थानिक जनतेला जर वन्य प्राण्यांकडून त्रास झाला, तर तातडीने याची दखल घेण्यात येईल आणि नुकसानभरपाई देता येईल, असाही एक पर्याय सुचविण्यात येत आहे. म्हणूनच जर कार्यालये, वनकर्मचारी व्याघ्र प्रकल्पात नसतील तर काय लोकांना वन्यप्राण्यांच्या जबड्यात देणार काय, असा सवाल व्यक्त होत आहे. वन्यजीवच्या कडक कायद्याचा किस्सा --गावकऱ्यांनी स्वत:च्या शेतातील चिंचेची दोन झाडे सरपणासाठी तोडली. या झाडांवर ३२० वटवाघळांची घरे होती. याबाबत पर्यावरणप्रेमींनी तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल घेतली गेली. गावकऱ्यांना वनविभागाच्या कडक कायद्याला सामोरे जावे लागले. तब्बल ४५० जणांना अटक करण्यात आली.