शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
4
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
5
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
6
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
7
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
8
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
9
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
10
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
11
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
12
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
13
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
14
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
15
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
16
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
17
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
18
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
19
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
20
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया

दरडी कोसळण्याचे संकट दूर करू

By admin | Updated: January 4, 2017 22:09 IST

मकरंद पाटील : माचुतर येथील वाडीचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर

महाबळेश्वर : ‘माचुतर गावावर पावसाळ्यात दरड कोसळली होती. ही दरड डोंगर उतारावरील रस्त्यावर थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. ही दुर्घटना टळली असली तरी ती पुन्हा येऊ नये यासाठी गावाच्या मागणीप्रमाणे माचुतरच्या खालच्या वाडीचे पुनर्वसन डोंगर माथ्यावर करण्याचा प्रस्ताव आपण शासनाला सादर केला आहे. गावावरचे दरडी कोसळण्याचे संकट कायमचे दूर करून गाव संकटमुक्त करू,’ अशी ग्वाही आमदार मकरंद पाटील यांनी दिली.महाबळेश्वर तालुक्यातील माचूतर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब भिलारे, नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, माजी नगराध्यक्ष किसन शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, माजी उपसभापती संजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.माचुतर गावचे सुपुत्र किसन शिंदे व सुनील शिंदे यांची महाबळेश्वर नगरपालिकेच्या नगरसेवकपदी निवडून आले त्याबद्दल गावच्या वतीने आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला तसेच नूतन नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, नगरसेवक संदीप साळुंखे, कुमार शिंदे, विमल पारठे, विमल आेंबळे, शारदा ढाणक, युसूफ शेख यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला ़माजी उपसभापती रामचंद्र शिंदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रद्धांजली वाहण्यात आली. बाळासाहेब भिलारे, संजय गायकवाड, नगरसेवक कुमार शिंदे यांनी मनोगत व्यक्त केल. यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष प्रवीण भिलारे, संजय मोरे, विठ्ठल जाधव, सुरेश शिंदे , उपसरपंच नारायण शिंदे, विठ्ठल शिंदे,मधुकर शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बापू शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. मुन्ना वारुणकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)विकास साधणार..मकरंद पाटील म्हणाले, ‘माचुतरच नव्हे महाबळेश्वर तालुक्यातील प्रत्येक गावात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माध्यमातूनच विकास कामे झाली आहेत. तर अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. या पुढेही तालुक्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये ग्रामस्थांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पाठीशी राहावे,’ असे आवाहन मकरंद पाटील यांनी केले.