शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कीर्तनातून उलगडते ती ज्ञानेश्वरीची ओवी : मनीषा खांडे यांचा प्रबोधनात्मक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 23:09 IST

सातारा : आज प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. प्रवचन करणं हे खरंतर पुरुषाचं काम. परंतु माण तालुक्यातील कोळेवाडी येथील मनीषा प्रकाश खांडे या व्याख्यानाबरोबर प्रवचन देण्याचंही काम करीत आहेत.

ठळक मुद्देधकटवाडीची सुप्रिया महाडिक पोहोचवतेय घरोघरी ज्ञानेश्वरी

भोलेनाथ केवटे।सातारा : आज प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. प्रवचन करणं हे खरंतर पुरुषाचं काम. परंतु माण तालुक्यातील कोळेवाडी येथील मनीषा प्रकाश खांडे या व्याख्यानाबरोबर प्रवचन देण्याचंही काम करीत आहेत. मनीषा खांडे यांचे पती सीमेवर देशसेवा करीत असताना दुसरीकडे मनीषा खांडे यांनी प्रवचनाच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत अंगिकारले आहे.

मनीषा खांडे या मूळच्या माण तालुक्यातील कोळेवाडी गावच्या. खटाव तालुक्यातीलल डोंबाळे त्यांचं सासर. मनीषा खांडे सांगतात, ‘त्यांचे आजोबा, वडील कीर्तनकार होते. वारकरी संप्रदायातील त्यांची ही पाचवी पिढी आहे. परंपरागत चालत आलेला प्रबोधनात्मक उपक्रमाचा हा मार्ग मी अवलंबला आहे, याचा माझ्या कुटुंबाला अभिमान आहे. पती आर्मीत आहेत. ते भोपाळ येथे देशासाठी कर्तव्य बजावत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांवर त्या व्याख्यान देतात. प्रत्येक घरात शिवराय व त्यांचा खरा इतिहास पोहोचविला पाहिजे, हा त्यांचा मानस आहे. व्याख्यानातून ते शिवाजी महाराजांचा इतिहास जागा करतात तर प्रवचनातून व्यसनमुक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवितात. प्रवचनाच्या माध्यमातून संत तुकाराम, ज्ञानेश्वर यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवितात आणि विशेष म्हणजे या यासाठी मानधनाचीही अपेक्षा केली नाही. जे देतील त्या माध्यमातून त्या प्रवचनाचे, व्याख्यानाचे कार्य करतात.आजचा भरकटलेला तरुण व्यसनमुक्त कसा होईल? व्यसनमुक्तीवर व्याख्यान देत आहेत. अनेकांना व्यसनाचे तोटे समजावून सांगत आहेत.नववीपासून आवड...खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोलीजवळील धकटवाडी या गावातील सुप्रिया त्रिंबक महाडिक हीसुद्धा समाजप्रबोधनात्मक प्रवचन करत आहे. ती ज्ञानेश्वरीवर प्रवचन करते. इयत्ता नववीपासून ती प्रवचनाचे काम आवडीने करीत आहे. आता ती छत्रपती शिवाजी महाविद्यालय वडूज येथे पदव्युत्तरच्या वर्गात शिकत आहे. मानधनाची कोणतीही अपेक्षा न करता घरोघरी ज्ञानेश्वरी पोहोचविण्याचे काम ती करीत आहे. 

मला समाजप्रबोधन करायला आवडते. माझे वडील, आजोबा हेसुद्धा कीर्तनकार असल्याने समाजासाठी काहीतरी करावे, यासाठी मी हा मार्ग स्वीकारला. माझ्या कुटुंबाचा या समाजप्रबोधनात्मक उपक्रमास पूर्ण पाठिंबा आहे. पुढे कीर्तनही करण्यास मला आवडेल.- मनीषा खांडे, प्रवचनकार