कराड दक्षिण विभागातील प्रती आळंदी म्हणून ओळख असलेले घोगाव येथील श्री संतकृपा मंदिर आहे. या मंदिरात ह.भ.प. संजय भावके यांच्यावतीने वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्यास ७२५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने राज्यभर सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. याचे औचित्य साधून येथे हा धार्मिक कार्यक्रम होत आहे. पहाटे श्री ज्ञानेश्वर माऊली जलाभिषेक, ज्ञानेश्वरी अध्याय नऊ व बारा याचे वाचन, राम कृष्ण हरी सामुदायिक जप, प्रवचन हरिपाठ, कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत. तसेच महाप्रसादाने याची सांगता होईल. या कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन शिवराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल नर्सिंग सायन्सेस व गुरुकुल स्कूलच्यावतीने करण्यात आले आहे. तरी परिसरातील भाविकांनी ज्ञानदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संजय भावके यांनी केले आहे.
घोगाव येथे ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:23 IST