कऱ्हाड : ‘लोकांनी ज्ञानेश्वरांवर दगड मारण्यासाठी हात उचलला. मात्र, ज्ञानेश्वरांनी लोकांना आशीर्वाद देण्यासाठी हात उचलला,’ असे प्रतिपादन बाबा महाराज सातारकर यांनी केले.येथे आयोजित यशवंत महोत्सवात ते बोलत होते. महोत्सवाच्या मंगळवारच्या तिसऱ्या दिवशी बाबा महाराज सातारकर यांनी पसायदानाचा अर्थ व महती आपल्या कीर्तनातून सांगितली़ बाबा महाराज सातारकर म्हणाले, ‘विचारांची परिपूर्तता म्हणजेच विवेक आणि परिपूर्णतेची अनुभूती म्हणजेच ज्ञानेश्वरी़ म्हणूनच संत जनाबार्इंनी आपल्या अभंगातून ‘विवेक सागरू सखा, माझा ज्ञानेश्वरू’ असे ज्ञानेश्वरांचे वर्णन केले आहे़ ‘पुढा स्रेह पाझरे, शब्द पाठी अवतरे’, ‘मागे पाझरती अक्षरे, कृपा आधी’ असे संत म्हणजेच ज्ञानेश्वऱ ज्ञानेश्वरांना वाड््देवता प्रसन्न होती़ निवृत्तीनाथांची गुरुकृपा होती. म्हणूनच ज्ञानेश्वरी उदयाला आली़ माझे कीर्तन हे प्रॅक्टिकल कीर्तन असून, चित्त विकाराने ते रंगले आहे. श्रीरंगाच्या प्रेमाने ते कीर्तन रंगू द्या़, असा रंग कीर्तनाशिवाय कुठेच मिळणार नाही़ म्हणूनच आधुनिक काळातही विविध वयोगटांतील लोकांचे पाय कीर्तनाकडे वळले आहेत़’ महोत्सवात गुरुवारी काल्याचे कीर्तन होणार आहे़ शुक्रवारी पद्मनाभ गायकवाड व सहकलाकार यांचा कार्यक्रम होणार आहे़ (प्रतिनिधी)चार पिढ्यांकडून नामसंकीर्तनयशवंत कीर्तन महोत्सवात मंगळवारी भाविकांना बाबा महाराजांच्या चार पिढ्या एकत्र पाहावयास मिळाल्या. कीर्तनावेळी बाबा महाराज सातारकर यांच्यासह त्यांची कन्या भगवती महाराज, भगवती महाराजांचे चिरंजीव चिन्मय महाराज व चिन्मय महाराजांची चिमुकली कन्याही त्यांच्यासोबत होती. बाबा महाराजांच्या पत्नीही व्यासपीठावर उपस्थित होत्या.
ज्ञानेश्वरांनी आशीर्वाद दिला : सातारकर
By admin | Updated: January 21, 2015 23:49 IST