शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीमुळं वाहन बाजार सुसाट; आगाऊ बुकिंग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:52 IST

दत्ता यादव ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : काही नोकरदारांचा बोनस झाला आहे किंवा काहीजणांचा होणार आहे. परंतु, अनेकांची पावले दुचाकी बाजाराकडे वळायला लागली आहेत. यंदाची दिवाळी संस्मरणीय ठरविण्यासाठी वाहन खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दसºयापेक्षा दुपटीनं उलाढाल होण्याची शक्यता दुचाकी-चारचाकी विक्रेत्यांमधून व्यक्त केली जात आहे.घरातील प्रत्येकजण दिवाळीचं नियोजन ...

दत्ता यादव ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : काही नोकरदारांचा बोनस झाला आहे किंवा काहीजणांचा होणार आहे. परंतु, अनेकांची पावले दुचाकी बाजाराकडे वळायला लागली आहेत. यंदाची दिवाळी संस्मरणीय ठरविण्यासाठी वाहन खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दसºयापेक्षा दुपटीनं उलाढाल होण्याची शक्यता दुचाकी-चारचाकी विक्रेत्यांमधून व्यक्त केली जात आहे.घरातील प्रत्येकजण दिवाळीचं नियोजन करत असतो. तसेच कुटुंब प्रमुखही प्रत्येकाच्या आवडी-निवडींचा विचार करून खरेदीचं नियोजन करत असतो. मुलगा किंवा मुलगी महाविद्यालयात जाते. रिक्षाने जायचं म्हटल्यावर गर्दीत हाल होतात. घरी यायला उशीर लागतो. हा विचार करून यंदाच्या दिवाळीत घरात दुचाकी आणण्याचा संकल्प केला जात आहे.त्याचप्रमाणे मंडई आणणं, मुलांना शाळेत, शिकवणीला सोडणं-घरी आणणं ही कामे नोकरी, व्यवसाय सांभाळून करावी लागतात. कामाचा ताण कमी करण्याच्या निमित्ताने काहींच्या घरी यंदा दुचाकी येणार आहे. सौभाग्यवतीला गाडी घेऊन दिली तर अनेक कामे ते करतील अन् आपल्याला आराम करायला मिळेल, हा त्यामागचा हेतू असला तरी घरी चारचाकी आणायची, हे मात्र नक्की केलं आहे.यंदा पाऊसही चांगला झालेला असल्याने गणेशोत्सव, दसरा या सणाला मोठी उलाढाल झाली आहे. साहजिकच दिवाळीचा सणही चांगला जाण्याची आशा आहे. त्यामुळे वाहन विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदी करून ठेवले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शोरूम विद्युत रोषणाई, आकाश कंदिलांनी सजविले आहेत. यासाठी काहींनी अर्थसहाय्यही उपलब्ध करून देण्याची हमी दिली आहे. तर काहींनी घवघवीत सूट देऊ केली आहे.पाडव्याच्या मुहूर्ताला घरीऐन सणाच्या तोंडावर हव्या त्या रंगाच्या गाड्या मिळत नाहीत. त्यामुळे शेकडो ग्राहकांनी ठराविक रक्कम भरून आगाऊ नोंदणी करून ठेवली आहे. या गाड्या पाडव्याच्या मुहूर्तावर घरी आणल्या जाणार आहेत.