शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांची दिवाळी, झेंडू उत्पादकांचं दिवाळं

By admin | Updated: October 30, 2016 23:42 IST

दर गडगडले : दहा रुपये किलोनेही खपेना; रस्त्यावर झेंडू टाकून शेतकरी परतले घरी

कऱ्हाड / मलकापूर : झेंडू फुलांचा दसऱ्यावेळी किलोला २० ते ५० रुपये दर मिळाला; मात्र दिवाळीला झेंडूचे दर १० ते २० रुपये प्रतिकिलो असे गडगडल्याने जादा दर मिळण्याची अपेक्षा बाळगणारा झेंडू उत्पादक शेतकरी तोट्यात आला, तर किरकोळ विक्री करणारे व्यावसायिकही अडचणीत आले आहेत. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर फुलविलेला झेंडू पाडव्याच्या मुहूर्तावर कोमेजून गेला. रविवारी सायंकाळी झेंडूचा ढीग रस्त्याकडेला टाकूनच काही शेतकरी घरी परतले. नेहमीच्या पिकांना योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी भाजीपाला व फुलशेतीसह इतर पिकांकडे वळत आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतीतून चार पैसे जादा मिळविण्यासाठी फूल, तसेच फळांची शेती करण्यावर भर दिला आहे. त्यातील एक म्हणजे सणासुदीला चांगले पैसे मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे झेंडूच्या फुलांचे उत्पादन होय. त्याच्यापासून जादा पैसे मिळतात. यावर्षी कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांनीदेखील झेंडूचे उत्पादन घेतले आहे. यावर्षी झेंडूचे मोठ्या प्रमाणात उत्पादनघेणाऱ्या शेतकऱ्यांना झेंडूच्या अचानक गडगडलेल्या दरामुळे चांगलाच फटका बसला आहे. झेंडूच्या रोपांची लावणी केल्यापासून ते उत्पादन बाजारात पोहोच करण्यापर्यंतचा उत्पादन खर्चाचा विचार करता फुलांना दसरा व दिवाळीला मिळालेला दर शेतकऱ्याला तोट्यातच घेऊन जाणारा ठरला आहे. दसऱ्याला जेमतेम फुलांना २० ते ४० रुपये प्रतिकिलो असा दर मिळाला. दसऱ्याला नाही तर दिवाळीला तरी योग्य दर मिळेल, अशी शेतकऱ्यांनी अपेक्षा ठेवली होती; मात्र दिवाळीला तर एक किलो झेंडूच्या फुलांना १० ते २० रुपयांनाही ग्राहक मिळेना, अशी अवस्था झाली. दिवसभर ओरडून-ओरडून घसा कोरडा झाला तरी ग्राहकांची पावले आपल्याकडे वळत नसल्याचे पाहून ऐन सणासुदीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आसवे दाटून आली. शेतीत घातलेल्या खर्चाएवढाही पैसा मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले. त्याचबरोबर सिझनल व्यवसाय करणारे व्यावसायिकही घाऊक पद्धतीने खरेदी केलेल्या दरापेक्षा कमी दराने फुलांची किरकोळ विक्री करावी लागल्याने अडचणीत आले आहेत. २० रुपये खरेदी, १० रुपये विक्री कोणताही व्यवसाय करून चार पैसे कमाविण्याचा अनेकांचा उद्योग असतो. त्यानुसार दिवाळीला झेंडूच्या फुलांचा व्यवसाय करायचा या उद्देशाने अनेकांनी १५ ते २५ रुपये प्रतिकिलो झेंडूच्या फुलांची घाऊक पद्धतीने खरेदी केली होती. मात्र, गेली दोन दिवसांपासून सातत्याने फुलांचे दर गडगडून तो पाच ते १० रुपयाने खाली आल्याने असे छोटे व्यावसायिकही अडचणीत आले आहेत.