शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा पुन्हा गारठला

By admin | Updated: December 17, 2014 23:01 IST

शेकोट्या पेटल्या : महाबळेश्वरचा पाराही उतरला

सातारा : देशासह राज्यात सुरू असलेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये जिल्ह्याचा पारा खालावला आहे. साताऱ्याचे तापमान चक्क दहा अंशपर्यंत उतरल्याने सर्वत्र हुडहुडी भरली आहे. थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरचे तापमान मंगळवारी दहा तर बुधवारी नऊ अंश सेल्सिअस पर्यंत उतरले होते.जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या वळवाच्या पावसामुळे सर्वत्रच थंडीचे प्रमाण वाढले असून, प्रामुख्याने महाबळेश्वरमध्ये थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. डिसेंबर महिन्यात दहा अंश सेल्सिअस या सर्वात कमी तापमानाची नोंद याठिकाणी करण्यात आली आहे. मात्र, बुधवारी चक्क नऊ अंश सेल्सिअस पर्यंत खालावला. महाबळेश्वरसह जिल्ह्यातील वाई, खंडाळा, जावळी, फलटण, कऱ्हाड अशा प्रमुख ठिकाणी हिवाळ्यामध्ये वळवाने हजेरी लावल्याने थंडीचे प्रमाण वाढले आहे. याठिकाणी कमाल तापमान २३ ते २६ अंश सेल्सिअस असून, किमान तापमानाची नऊ ते तेरा अंश सेल्सिअस इतकी नोंद करण्यात आली आहे. याठिकाणी पहाटे व रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी पडत असून, वळवाने हजेरी लावल्यास पारा अधिक खालावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील प्रमुख तालुक्यांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्येसातारा - 10कऱ्हाड - 12वाई - 9खंडाळा - 9 महाबळेश्वर - 9फलटण - 10जावळी - 9माण - 11खटाव - 12कोरेगाव - 11पाटण - 10