शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जि. प.साठी ६३१, तर पं. स.साठी ४२८ अर्ज

By admin | Updated: February 4, 2017 00:00 IST

काँगे्रस, राष्ट्रवादी, विकास आघाडी, शिवसेनेचे सस्पेन्स

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात लगबग वाढली आहे. शुक्रवारअखेर पंचायत समितीसाठी आॅनलाईन पद्धतीने ६३१, तर जिल्हा परिषदेसाठी ४२८ उमेदवारांनी नोंदणी केली. शुक्रवारी पंचायत समितीसाठी ७०, तर जिल्हा परिषदेसाठी ३६ जणांनी प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असली तरी राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँगे्रस, सातारा विकास आघाडी, शिवसेना यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. पंचायत समितीसाठी शुक्रवारी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आकडेवारी अशी- सातारा : ६, जावळी : ८, कोरेगाव : ४, माण : २, खटाव : ४, वाई : १, महाबळेश्वर : १, खंडाळा : १, फलटण : ११, कऱ्हाड : २७, पाटण : ५. जिल्हा परिषदेसाठी तिसऱ्या दिवसअखेर ४९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक शुक्रवारी येथील जिल्हा बँकेत झाली, तर काँगे्रसच्या वतीने शनिवारी पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीने अद्याप निर्णय गुलदस्त्यात ठेवला असला तरी अर्ज भरण्याचे खाते खोलले आहे. कोडोली, शेंद्रे, अपशिंगे या गट व गणांतून सातारा विकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. कोडोलीतून दिलीप जाधव, रामदास साळुंखे, मनोज गायकवाड यांनी सातारा विकास आघाडीतून अर्ज दाखल केले. शेंद्रे गणातून पाकिजा मुलाणी, अपशिंगे गणातून पृथ्वीराज निकम यांनी अर्ज दाखल केले. अपशिंगे गणातून विकास जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कोडोली गटातून वैजयंतीमाला कदम, शेंद्रे गटातून कृष्णत शेळके (अपक्ष), बाजीराव बाबर (सातारा विकास आघाडी), संजय पोतेकर (सातारा विकास आघाडी) यांनी, तर वर्णे गटातून चंदन शिंदे (राष्ट्रवादी) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उदयनराजेंची फौज पुढे...जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीने सातारा व जावळी या दोन तालुक्यांत काँगे्रसशी आघाडी केली आहे. मात्र, उमेदवारी देण्याचा निर्णय जाहीर केलेला नाही. तरीही उदयनराजेंची फौज पुढे होऊन उमेदवारी अर्ज दाखल करताना पाहायला मिळत आहे.