शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरीय मॅरेथॉनने शहीद शशिकांत मोरेंना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 19:13 IST

जिल्ह्यास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करून शहीद पोलिस उपनिरीक्षक शशिकांत मोरे यांना जावळी तालुक्यात अभिवादन करण्यात आले. स्पर्धेत दीड हजार तरुण सहभागी झाले.

ठळक मुद्देहजारो तरुण सहभागी सावलीत स्मारक उभारण्यासाठी पोलिस कल्याण निधीतून मदत देणार

मेढा : जिल्ह्यास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करून शहीद पोलिस उपनिरीक्षक शशिकांत मोरे यांना जावळी तालुक्यात अभिवादन करण्यात आले. स्पर्धेत दीड हजार तरुण सहभागी झाले.

यावेळी शशिकांत मोरे अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, उद्योजक विजय शेलार, जावळी पंचायत समितीचे सभापती अरुणा शिर्के, उपनगराध्यक्ष पांडुरंग जवळ, तहसीलदार रोहिणी आखाडे, गटविकास अधिकारी सतीश बद्धे, सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने उपस्थित होते.

यावेळी पोलिस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, सावली गावचे सुपुत्र शहीद शशिकांत मोरे यांचे बलिदान जावळीकरांसाठी प्रेरणादायी आहे. सावली येथे उभारण्यात येणाºया मोरे यांच्या स्मारकासाठी पोलिस कल्याण निधीतून मदत केली जाईल. मोरे शहीद झाले त्या गडचिरोलीत आजही युद्धजन्य परिस्थिती आहे. सीमेवर शत्रू ओळखता येतो. पण नक्षलवादी क्षेत्रात शत्रू ओळखणे अवघड आहे.

माजी आमदार सपकाळ म्हणाले, ह्यशहीद शशिकांत मोरे यांच्या बलिदानाने जावळी तालुक्यातील एक लढवय्या शुराला मुकावे लागले. सावली येथे उभारले जात असलेल्या स्मारकासाठी समाजातून सहकार्य मिळावे.

स्पर्धेत सुमारे दीड हजार स्पर्धक सहभागी झाले. यावेळी खुल्या पुरुष गटात अनुक्रमे स्वप्नील सावंत, आदिनाथ भोसले, आकाश हिरवे. खुला गट महिलांमध्ये स्नेहल हिरवे, आकांक्षा शेलार, प्रियांका टिंगरे.

१४ वर्षांखालील पुरुष गट गणेश शिंदे, सूरज गावित, रोहन गाढवे. सतरा वर्षांखालील मुली : विशाखा साळुंखे, प्रतीक्षा मांढरे, अश्विनी मांढरे.सतरा वर्षांखालील मुले : सूरज कोकरे, बाळू पुकळे, प्रतीक उंबरकर. चौदा वर्षांखालील मुली : रोशनी पाटणकर, ज्ञानी चिकणे, वैष्णवी मोरे यांनी यश मिळविले.

विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी शहीद मोरे यांचे वडील तुकाराम मोरे, वीरमाता कांताबाई उपस्थित होते. सुरेश मोरे यांनी स्वागत केले. अशोक लकडसे यांनी सूत्रसंचालन केले. शामराव जुनघरे यांनी आभार मानले.