शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंतदादा’ला जिल्हा बँकेची जप्तीची नोटीस

By admin | Updated: February 25, 2016 01:22 IST

साठ दिवसांची मुदत : १०२ कोटी ५४ लाख रुपये थकीत

सांगली : सेक्युरिटायझेशन अ‍ॅक्ट (सुरक्षितत्ता आणि आर्थिक मालमत्ता पुनर्रचना आणि सुरक्षा व्याज कायदा २00२) नुसार सांगली जिल्हा बँकेने १0२ कोटी ५४ लाख रुपयांच्या थकबाकीसाठी येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यासह २६ संचालकांना बुधवारी नोटीस बजावली. ६0 दिवसांत ही रक्कम भरली नाही, तर कायद्यातील तरतुदीनुसार स्थावर व जंगम मालमत्ता ताब्यात घेण्याचा इशारा बँकेने दिला आहे. जिल्हा बँकेने मार्चअखेर वसुलीची जोरदार मोहीम राबविली आहे. पहिल्याच टप्प्यात त्यांनी मोठा कर्जदार असलेल्या सांगलीच्या वसंतदादा कारखान्यास नोटीस बजावली आहे. कारखान्याची सध्याची थकबाकी १0२ कोटी ५४ लाख रुपये आहे. ही रक्कम कारखान्याकडून भरल्यानंतर त्यांचे कर्जाचे खाते नियमित होणार आहे. त्यामुळेच बँकेने कारखान्याला नोटीस बजावली आहे. यामध्ये कायद्यातील कलम १३ (२) नुसार ६0 दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत कारखान्याने ही रक्कम भरल्यास कारवाई टाळता येऊ शकते. पैसे भरले नाहीत, तर कलम १३ (३) नुसार कारखान्याची सर्व स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ६१ व्या दिवशी कारखान्याचा ताबा घेतला जाईल, असे बँकेने म्हटले आहे. कारखान्यास यापूर्वीही २00९ मध्ये सेक्युरिटायझेशन अ‍ॅक्टनुसार नोटीस बजावण्यात आली होती. त्यावेळी बँकेने ५५ कोटी रुपये भरून खाते नियमित केले होते. त्यानंतर आता याच कायद्यानुसार बँकेने पुन्हा नोटीस बजावली आहे. सध्याची थकबाकी मोठी असल्याने कारखान्याला आता ही रक्कम भरण्याची तजवीज करावी लागणार आहे. कारखाना यंदा चांगला चालला असला तरी, थकबाकीची रक्कम मोठी आहे. जिल्हा बँकेने ‘टॉप’च्या थकबाकीदारांवर वसुलीसाठी कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात मोठ्या थकबाकीदारांकडून रकमा वसूल केल्या जाणार आहेत. त्यानंतर उर्वरित थकबाकीदारांनाही नोटिसा बजावल्या जातील. (प्रतिनिधी) नोटिसा बजावलेले विद्यमान संचालक अध्यक्ष विशाल पाटील, उपाध्यक्ष डी. के. पाटील, बाळगोंडा पाटील, आदिनाथ मगदूम, निवास पाटील, किशोर जामदार, महादेव कोरे, सचिन डांगे, संदेश आडमुठे, सुनील आवटी, दत्तात्रय सूर्यवंशी, यशवंतराव पाटील, अशोक अनुगडे, अमित पाटील, सुखदेव पाटील, दिलीप पवार, शंकर पाटील, विजयकुमार मोहिते, विठ्ठल पाटील, प्रकाश कांबळे, राजेश एडके, यशवंत कलढोणे, शामराव पाटील, दुर्गादेवी शिंदे, सुनंदा फाळके, शैलजा जयप्रकाश पाटील. काय आहे कायदा... सुरक्षितता आणि आर्थिक मालमत्ता पुनर्रचना आणि सुरक्षा व्याज कायदा २००२ मधील तरतुदीनुसार एखाद्या कर्जदाराकडून थकबाकीद्वारे परतफेड होऊ शकली नाही, तर कर्जदाराच्या तारण मालमत्तेचा ताबा घेऊन खात्यास ते जोडण्याचा अधिकार वित्तीय संस्थांना प्राप्त झाला आहे. यामुळे संबंधित वित्तीय संस्थेला नॉन परफॉर्र्मिंग असेटस्मध्ये (एनपीए) घट होण्यास मदत मिळू शकते.