शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

गावोगावी वीजवितरणच्या ‘झटक्याची भीती!’

By admin | Updated: June 27, 2016 00:44 IST

‘वीजवितरण’चे दुर्लक्ष : गंजलेले खांब अन् उघडे ट्रान्सफार्मर झाडवेलींच्या विळख्यात; ठिकठिकाणी लोबंकळणाऱ्या तारा, पावसाळापूर्व तपासणीही नाही

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील अनेक गावांत विद्युत खांब आणि ट्रान्सफार्मरची दुरवस्था झाली आहे. अनेक गावांतील खांबांना गंज चढला असून, रस्त्याकडेला असलेल्या विद्युत वाहिन्या खाली लोंबकळत असलेल्या दिसून येत आहेत. तर ट्रान्सफार्मरला झाडवेलींनी विळखा घातला आहे. पावसाळा जवळ आला तरी अद्याप वीजवितरण विभागाकडून या धोकादायक वाकलेले खांब बदलण्यात आले नसून, झाडवेलीही हटविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात गावोगावी वीजवितरणच्या खांबांतून व तारांमधून बाहेर पडणारऱ्या ठिणग्यांची भीती निर्माण झाली आहे.पावसाळा जवळ आला की, वीजवितरण कंपनीतील अधिकारी, वायरमन व कर्मचाऱ्यांकडून ग्रामीण भागातील वीजवितरण करणारे ट्रान्सफार्मर, डीपी तसेच तारांची दुरुस्ती करण्याची कामे होती घेतली जातात. पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा वीजपुरवठा खंडित होऊ नये तसेच दुर्घटना घडू नये, यासाठी वीजवितरण काळजी घेत असते; मात्र यावेळेस जून महिना संपत आला व पावसाळा सुरू झाला तरी अद्यापही वीजवितरण विभागाकडून तालुक्यातील ग्रामीण भागातील मोडकळलेले डांब, दरवाजा तुटल्याने उघड्या पडलेले डीपी बॉक्स यांची डागडुजी करण्यात आलेली नाही.वीजवितरणकडून अद्यापर्यंत ग्रामीण भागातील वीजखांबांची दुरुस्ती केली गेली नसल्याने पावसाळ्यात पुन्हा खांब कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे, त्यापासून दुर्घटना घडणे अशा घटनांना सामोरे जावे लागणार आहे. चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या खांबांची दुरुस्ती करावी तसेच ते काढून टाकून त्याजागी नवीन खांब बसवावेत, लोंबकळणाऱ्या तारा वर ओढून घेण्यात याव्यात, तुटलेले ट्रान्सफार्मरचे दरवाजे बसवावेत, अशा कामांबाबत गेल्या सहा महिन्यांपासून पंचायत समितीच्या मासिक सभेत अधिकाऱ्यांना सभापती, सदस्यांकडून सूचनाही करण्यात आलेल्या आहेत. मात्र, आपल्या जबाबदारीचे भान हरवून बसलेल्या या अधिकाऱ्यांना सभापती, सदस्यांच्या प्रश्नांचा जणू विसरच पडला असल्याचे सध्या दिसून येत आहे. वीजवितरणच्या कारभाराबाबत ग्राहकांसह सदस्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. अनेकवेळा मासिक सभांमधून वीजवितरणच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी करून देखील त्यांच्याकडून किती कार्यवाही केली जाते. याचे संशोधनच करणे गरजेचे असल्याचे काही सदस्यांचे म्हणणे आहे. सध्या तालुक्यात अनेक ठिकाणी जीर्ण झालेले विद्युत खांबांही तुटून पडण्याची भीती निर्माण झाली आहे.विद्युत तारांच्या तुटण्याने त्यापासून शॉक लागून जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटना तालुक्यात यापूर्वी अनेकदा घडलेल्या आहेत. त्याची भरपाई देखील वीजवितरण कंपनीकडून दिली जाते का? येणके, पोतले, विंग परिसरात असलेल्या ट्रान्सफॉर्मर व विद्युतखांबांना मोठ्या प्रमाणात झाडवेलींचा विळखा पडला आहे. पावसाळ्यात या भागात अनेकवेळा वीज जाण्याचे प्रसंगही घडत असतात. त्यामुळे पावसाळापूर्वी वीजवितरण कंपनीकडून या भागासह तालुक्यातील अनेक गावांत असलेल्या धोकादायक विद्युत खांब व गंजलेले लोखंडी खांब, उघडे डीपी बॉक्स दुरुस्त अथवा बदलणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)प्रत्येक मासिक सभेत अधिकाऱ्यांवर आगपाखडगंजलेल्या खांबांना व लोंबकळणाऱ्या वीजवाहक वाहिन्यांना बदलण्याबाबत अनेकदा पंचायत समितीच्या प्रत्येक मासिक सभेत सभापती व सदस्यांकडून वीजवितरण कंपनीचे अधिकारी धारेवर धरले जातात. नुकत्याच झालेल्या मासिक सभेतही अधिकाऱ्यांवर सदस्यांनी आगपाखड केली. पावसाळापूर्व तपासणी केली आहे का? धोकादायक व वाकलेले खांब बदलण्यात आलेले आहेत का? अशी विचारणा केल्यास अधिकाऱ्यांनी ‘लवकरच करतो,’ असे सांगितले. अशा प्रकारे प्रत्येक सभेत अधिकाऱ्यांकडून सभापतींसह सदस्यांच्या सुचनांना, प्रश्नांना ऐकून घेण्याची कामे केली जात आहेत.दुर्घटना टाळण्यासाठी हे उपाय गरजेचे...पावासाळापूर्वी कर्मचाऱ्यांनी लाइन पेट्रोलिंग करावे.उघडे व मोडकळले असलेले डीपी बॉक्स दुरू स्त करावेत.जंप बदलणे, वीज तारांवरील पावडर काढणेइन्सुलेटर बदलणेजमिनीपासून उंचीवर वीजवाहक तारा ओढणेवीजवाहक तारांवरील झाडवेली हटविणेगंजलेले ट्रान्सफॉर्मर अन् वाकलेले खांबतालुक्यातील कोपर्डे हवेली, कार्वे, कोडोली, कोरेगाव, किरपे, येणके, पोतले, पाटीलमळा, विंग, चचेगाव, धोंडेवाडी, काले, उंडाळे परिसरात अनेक ठिकाणी गंजलेले, उघडे असलेले ट्रान्सफॉर्मर व वाकलेले खांब असून, त्यांची डागडुजी करणे गरजेचे आहे.