शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

क्रेन बिघडल्याने विसर्जनाची कसरत

By admin | Updated: September 27, 2015 00:28 IST

कृत्रिम तळे : सार्वजनिकसह घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन

सातारा : पालिकेने गणपती विसर्जनासाठी तयार केलेल्या कृत्रिम तळ्यांमध्ये मूर्तींचे विसर्जन करताना शनिवारी पालिका कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. मूर्ती ठेवण्यासाठी आणलेल्या क्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काही काळ मोठ्या गणपतींचे विसर्जन रखडले. रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक तसेच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन सुरु होते. शहरातील मंडईचा राजा, सोमवार पेठेतील आझाद मंडळ, कोटेश्वर मंदिराशेजारील नर्मदेश्वर मंडळ, शेटे चौकातील शंकर-पार्वती या प्रमुख गणेश मंडळांसह १0 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन शनिवार होणार असल्याची नोंद पालिकेकडे होती. शहरातून वाजत-गात व गुलाच्या उधळणीत विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. मोती चौकातून कमानी हौद-शेटे चौक, गुरुवार परज मार्गे गणेश मूर्तींची मिरवणूक पुन्हा मोती चौकात गेली. तिथून प्रतापगंज पेठेतून राधिका टाकीजमार्गे राधिका रस्त्यावरील प्रतापसिंह शेती फार्ममध्ये असलेल्या कृत्रिम तळ्यामध्ये गणपती विसर्जित करण्यात आल्या. विसर्जन मार्गामध्ये पोलिसांनी कडा पहारा ठेवला होता. या मार्गावर वाहने लावण्यास बंदी घालण्यात आली होती. वाहतूक शाखेची व्हॅन या रस्त्यांवरुन फिरत होती, तसेच वाहनधारकांना वाहने उभी करु नयेत, अशा सूचना केल्या जात होत्या. विसर्जनासाठी प्रतापसिंह शेती फार्म, दगडी शाळा, कर्मवीर उद्यान, गोडोली, हुतात्मा उद्यान या ठिकाणी तयार केलेल्या कृत्रिम तळ्यांभोवती पालिकेच्या वतीने जीवरक्षकांची व्यवस्था केली होती. विसर्जनावेळी पालिकेची चांगलीच कसरत झाली. गणपती मूर्ती विसर्जन पाहण्यासाठी रस्त्याने येणा-जोणार थांबून तळ्याच्या भिंतीवर जात होते. पालिका कर्मचारी व पोलिसांना वारंवार त्यांना सूचना कराव्या लागल्या. अखेर पालिका कर्मचाऱ्यांना रस्त्याच्या बाजूने बांबू रोवून त्यावर पत्रे ठोकावे लागले. (प्रतिनिधी)