शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:40 IST

किडगाव : ‘गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या कोसळधार पावसाने किडगाव आणि कण्हेर परिसरात उसंत दिल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला ...

किडगाव : ‘गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या कोसळधार पावसाने किडगाव आणि कण्हेर परिसरात उसंत दिल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, कण्हेर धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अद्यापही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने किडगाव - हमदाबाज पूल अद्यापही पाण्याखालीच आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

महिन्याभरापासून पावसाने दडी मारली होती. मात्र, शुक्रवारपासून या परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे कण्हेर धरण ओव्हरफ्लो झाले असून, धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या चारही दरवाजांतून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात असल्याने वेण्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक गावांमधील स्मशानभूमी पाण्याखाली गेल्या आहेत. रविवारपासून या परिसरात पावसाने उसंत दिली असून, दिवसभरामध्ये पावसाची उघडझाप होत होती. मात्र, रात्री दहानंतर पहाटे ५ वाजेपर्यंत जोरदार पाऊस पडला.

दिवसा पावसाने उघडीप दिल्याने जनावरांना चारा आणणे व शेतातील काही किरकोळ कामे शेतकऱ्यांनी केली. कण्हेर धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. धरण ७५ टक्के भरले असून, गतवर्षी याच दिवशी धरण फक्त ४५ टक्के भरले होते. यावर्षी धरण लवकर भरल्याने शेतकऱ्यांचे चेहरे आनंदले आहेत तर पावसाने उघडीप दिल्याने घेवडा आणि भुईमूग पिकांना आधार मिळणार आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास काही पिके धोक्यात येऊ शकतात. जोरदार वाऱ्यामुळे उसाची शेती भुईसपाट झाली आहे.

Template

Image Attachment

Photo Manager

Social Media

Metadata

Attach Document

Translate

Backup

Agency

QrCode

Attch Audio/Video