शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

कण्हेरमधून पाण्याचा विसर्ग; संपर्क तुटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:22 IST

किडगाव : सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना वरदान ठरत असलेले कण्हेर धरण शुक्रवारी भरण्याच्या मार्गावर असल्याने पाणी पातळी नियंत्रित ...

किडगाव : सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना वरदान ठरत असलेले कण्हेर धरण शुक्रवारी भरण्याच्या मार्गावर असल्याने पाणी पातळी नियंत्रित राखण्यासाठी धरण प्रशासनाकडून गुरुवारी रात्री धरणाचे चारही दरवाजे एका फुटाने उचलून वेण्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नदीपात्रातील पाणी वाढ झाल्याने किडगाव-हमदाबाज या गावांना जोडणारा पूल व करंजे आणि म्हसवे गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने या दोन्ही पुलांवरील वाहतूक बंद करण्यात आली असून, अनेक गावांचा संपर्क यामुळे तुटला आहे.

या परिसरात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत होते. भात आणि सोयाबीनच्या पिकांनी माना टाकल्या होत्या. अशा अवस्थेत शेतकरी चिंतातूर झालेला असतानाच बुधवारी दुपारपासून कण्हेर, मेढा, महाबळेश्वर आणि किडगाव परिसरात जोरदार पावसाचे आगमन झाल्याने कण्हेर धरणात पाण्याचा साठा वाढू लागला. सद्य स्थितीत धरण ६९.२२ टक्के भरले असून, धरणात १३९१२ क्‍युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गुरुवारी रात्री उशिरा धरणाच्या चारही दरवाजांतून वेण्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. किडगाव-हमदाबाज पूल पाण्याखाली गेल्याने या पुलावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली असून, दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच करंजे आणि म्हसवे गावांना जोडणारा वेण्णा नदीवरील पूलसुद्धा पाण्याखाली गेल्याने या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक गावांच्या स्मशानभूमी पाण्याखाली गेल्याने मोठी अडचण झाली आहे.

चौकट..

ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले...

गतवर्षी याच दिवशी कण्हेर धरण ४३ टक्के भरले होते, तर यावर्षी लवकर धरण भरल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे. गेली दोन दिवस या परिसरात संततधार पडत असल्याकारणाने धावडशी-पिंपळवाडी-नेले डोंगर परिसरातील सर्व छोटे-मोठे पाझर तलाव भरून ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागल्याने वेण्णा नदीच्या पाणीपातळीत गुरुवारी सकाळपासूनच प्रचंड वाढ झाली होती.

चौकट..

सातारा-मेढा मार्गावर वाहतूक धिम्या गतीने

मेढा-केळघर रस्ता बंद असून, चिंचणी गावाजवळही रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सातारा-मेढा मार्गावरील वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. भात पिकासाठी हा पाऊस उपयुक्त असून, वेळे कामठी, कुसुंबी, मेढा परिसरात भात लागणीला वेग आला असून, शेतकरीवर्ग शेतीच्या कामात मग्न झालेला दिसत आहे.

फोटो आहे..

२३किडगाव०१/०२

कण्हेर धरण प्रशासनाकडून गुरुवारी रात्री धरणाच्या चारही दरवाजांतून वेण्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

कण्हेर धरण प्रशासनाकडून गुरुवारी पाणी सोडल्याने किडगाव (ता. सातारा) येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे.