शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

येवती रूग्णालयात ग्रामस्थांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 16:20 IST

येवती, ता. कºहाड येथील आरोग्य केंद्र असुण अडचण, नसून खोळंबा अशा स्थितीत आहे. येथे रूग्णांना योग्य त्या सोयीसुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देयेवती येथील ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया डॉक्टर, कर्मचाºयांचा मनमानी कारभारआरोग्य केंद्राची अवस्था असून अडचण नसून खोळंबा

उंडाळे : येवती, ता. कºहाड येथील आरोग्य केंद्र असुण अडचण, नसून खोळंबा अशा स्थितीत आहे. येथे रूग्णांना योग्य त्या सोयीसुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे.

येवती आरोग्य केंद्राअंतर्गत पाटीलवाडी, शेळकेवाडी, घराळवाडी, शेवाळेवाडी, हणमंतवाडी, म्हासोली अशी अनेक वाड्या वस्तीवरील गावे आहेत. या परिसरातील अनेक रूग्ण या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी येतात. मात्र, चक्क आरोग्य केंद्राचे डॉक्टरच उशिरा येत असल्याने रूग्णांना ताटकळत बसावे लागते.

सध्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची वेळ सकाळी दहा ते दोन आणि सायंकाळी चार ते पाच अशी आहे. मात्र, अशी वेळ असताना डॉक्टर व कर्मचारी अकरानंतर येतात. त्यामुळे येथील आरोग्य केंद्राला शिस्त लावणार कोण? असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. मात्र, गरीब व गरजू रूग्णांना खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत आहे.

येथील आरोग्य केंद्राची अवस्था ही असून अडचण नसून खोळंबा अशी झाल्याचे दिसून येते. यापूर्वी या आरोग्य केंद्राला दोन डॉक्टर कार्यरत होते. त्यामधील एका डॉक्टरांची बदली झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून या दवाखान्याने दुसरा डॉक्टर पाहिला नाही.

गेल्या दोन वर्षापूर्वी या दवाखान्यात रूग्णांची अक्षरश: गर्दी व्हायची. आणि दिवसाला तब्बल शंभर ते दीडशे रूग्णांची तपासणी केली जायची. आता मात्र, दवाखान्याकडे रूग्णही कमी जातात. कारण दवाखान्यामध्ये डॉक्टरच वेळवर उपलब्ध नसल्याने त्यांना माघारी फिरावे लागते.

येवती आरोग्य केंद्राच्या माध्यमातून डॉक्टरांचय निवासस्थानाची सोय करण्याचे काम जोमाने सुरू आहे. काही निवासस्थाने तयार असून सुद्धा डॉक्टर व कर्मचारी राहत नसून ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी दयनीय अवस्था येथील दवाखान्यांची झाली आहे. अशा डॉक्टर व कर्मचारी यांना शिस्तीचे धडे 

येवती प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन डॉक्टर कार्यरत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून एकाच डॉक्टर कार्यरत आहेत. आणि ते सुद्धा वेळेवर येत नाहीत. त्यामुळे रूग्णांना खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी जावे लागते. याकडे  आरोग्य विभागोन तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. सदरचा प्रश्न न मिटल्यास उग्र  आंदोलन छेडण्यात येईल.दिपक शेवाळेग्रामस्थ,येवती, ता. कºहाडयेवती आरोग्य केंद्राबाबत आमच्याकडेही काही तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची गांभिर्याने दखल घेतली असून जिल्हा आरोग्य अधिकाºयांशी याबाबत चर्चा झाली आहे. आरोग्य केंद्राबाबत योग्य त्या उपाययोजना करून ग्रामस्थांची गैरसोय दूर केली जाईल. - सुनिल कोरबू,तालुका आरोग्य अधिकारी