शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

दिग्दर्शन सर्वांत धाकटं बाळ... म्हणून लाडकं!

By admin | Updated: March 16, 2015 00:17 IST

अवधूत गुप्तेंची प्रसन्न मुलाखत : गायक ते दिग्दर्शक अशा बेधडक प्रवासाचे उलगडले अंतरंग--थेट संवाद

राजीव मुळ्ये - सातारा : ‘गायन हे माझं पहिलं बाळ. त्यातून पुढे संगीत दिग्दर्शन. मग त्यातून अँकरिंग आणि शेवटी दिग्दर्शन... अर्थातच दिग्दर्शन हे सगळ्यात धाकटं बाळ. त्यामुळं माझं ते जास्त लाडकं,’ अशा शब्दांत हरहुन्नरी कलावंत अवधूत गुप्ते यांनी आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वातला दिग्दर्शक आगामी काळात अधिक सक्रिय राहणार असल्याचे संकेत दिले. मराठीतल्या पहिल्या ‘अ‍ॅडॉप्टेशन’पासून सुरू झालेल्या आपल्या बेधडक प्रवासाचे अंतरंग त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या प्रसन्न मुलाखतीत उलगडले. एका कार्यक्रमासाठी साताऱ्यात आले असता गुप्ते यांनी रविवारी वेळात वेळ काढून ‘लोकमत’शी मनमोकळा संवाद साधला. मुंबईत ‘साउंड रेकॉर्डिंग’चा पदविका अभ्यासक्रम केल्यामुळेच अल्बमद्वारे संगीताच्या क्षेत्रात पदार्पण करण्याची ऊर्मी मिळाली, असं सांगून ते म्हणाले, ‘माझा जन्म मुंबईचा असला तरी आजोबांची बदली झाल्यामुळे आम्ही कोल्हापूरला आलो. तिथेच शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. परंतु अल्बमद्वारे रसिकांपुढे येण्यास कारणीभूत ठरला तो साउंड रेकॉर्डिस्टचा डिप्लोमाच. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ आणि ‘तुझे देख के मेरी मधुबाला’ गाणी गाजली आणि गायक म्हणून सुरू झालेला प्रवास हळूहळू संगीत दिग्दर्शनापर्यंत पोहोचला.’ पाश्चात्य शास्त्रीय संगीताचं शिक्षण गुप्ते यांनी घेतलेलं नाही. परंतु तरी त्याची झाक त्यांच्या गाण्यांमध्ये दिसते, ती साउंड रेकॉर्डिस्टचा डिप्लोमा करताना आलेल्या अनुभवांच्या बळावरच. कोल्हापुरात राहिल्यामुळं लोकसंगीताशीही चांगलीच जवळीक. दर दोन फर्लांगावर भाषा बदलते, तसंच लोकसंगीतही बदलतं, हा अनुभव घेतलेला. त्यामुळंच लोकसंगीताचा अस्सल बाज त्यांच्या गाण्यात ऐकायला मिळतो. ‘सर्वांत आधी ध्वनीची निर्मिती झाली. त्यातून साहजिकच आधी लोकसंगीत तयार झालं असणार आणि ते शास्त्रात बांधून शास्त्रीय संगीताची निर्मिती झाली असणार,’ अशी तर्कसंगती ते लावतात. मुंबईतल्या गणेशोत्सवात अवधूत गुप्ते नेहमीच सक्रिय. शिवसेनेत फूट पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जन्म झाल्यानंतरचा प्रसंग. त्यांच्या गणेशोत्सव मंडळाच्या एका कार्यकर्त्याने मनसेच्या पदाधिकाऱ्याकडून मोठी देणगी आणली आणि नेहमी शिवसेनेची जाहिरात असणाऱ्या मंडपात प्रथमच मनसेची जाहिरात झळकली. हेच मुंबईच्या अनेक मंडळांमध्ये घडत होतं. राजकारण गणपतीच्या मंडपापर्यंत आल्याचं जाणवून गुप्ते अस्वस्थ झाले आणि या अस्वस्थतेतूनच ‘मोरया’ चित्रपटाची निर्मिती झाली. महानगरीत येऊन संगीतात करिअर घडविणारा ग्रामीण तरुण त्यांच्या ‘इकतारा’चा नायक बनला. सभोवारच्या परिस्थितीकडे, घटना-घडामोडींकडे गुप्ते अत्यंत संवेदनशीलपणे पाहतात; म्हणूनच त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची कथा ते स्वत:च लिहितात. मुंबईबाहेर असणारा ‘खरा महाराष्ट्र’ चित्रपटात दाखवायलाही उत्सुक असल्याचं गुप्ते यांनी सांगितलं. यावेळी माधव सुर्वे, डॉ. सोमनाथ साबळे, जे. डी. गायकवाड आदी उपस्थित होते. ‘त्यावेळी’ गंमतच अनुभवता आली नाही ‘झेंडा’ हा अवधूत गुप्ते यांचा पहिला चित्रपट. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाच्या अंतरंगाबाबत बोलणारं ‘विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती,’ हे गीत आजही लोकप्रिय आहे. परंतु त्या दिवसांत दिग्दर्शनाची गंमतच आपल्याला अनुभवता आली नाही, असं गुप्ते सांगतात. या चित्रपटाच्या प्रक्रियेत तणावच अधिक होता. गुप्ते यांना धमक्या आल्या होत्या. पहिला चित्रपट असूनही दिग्दर्शन ‘एन्जॉय’ करता आलं नाही. त्यामुळंच आता ते दिग्दर्शक या नात्यानं रसिकांसमोर येण्यास अधिक उत्सुक आहेत.