शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

जावळीत बाचाबाची, नाराजी!

By admin | Updated: January 27, 2017 23:19 IST

राष्ट्रवादीत असंतोष : उमेदवार मुलाखतीवेळी वाद चव्हाट्यावर

मेढा : जावळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठीच्या उमेदवार मुलाखती कार्यक्रमादरम्यान वसंतराव मानकुमरे व योगेश गोळे यांच्यात झालेल्या बाचाबाचीने राष्ट्रवादीतील असंतोष उफाळून आल्याचे चित्र आहे. यामुळे जावळीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. दरम्यान, तालुक्यातील अमित कदम यांना उमेदवार निवडीत डावलल्याच्या चर्चेने राष्ट्रवादीतील वातावरण गढूळ झाल्याचीही चर्चा आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मेढा येथे घेण्यात आल्या. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, वसंतराव मानकुमरे यांच्यासह कोअर कमिटी मार्फत या मुलाखती घेण्यात आल्या. म्हसवे जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये दत्ता गावडे, बुवासाहेब पिसाळ, हणमंतराव पार्टे, योगेश गोळे हे होते. म्हसवे गणात वसंतराव मानकुमरे हे देखील उभे राहण्यास उत्सुक असून, कुडाळ येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी स्वत:ची उमेदवारी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीतच जाहीर केली होती. या पार्श्वभूमीवरच म्हसवे गटातून मुलाखत देण्यासाठी आलेले योगेश गोळे, दत्ता गावडे आदींनी मुलाखतीच्या वेळी वसंतराव मानकुमरे यांच्या उपस्थितीवरच हरकत घेतली व आमदार शिवेंद्रसिंहराजेंशी स्वतंत्रपणे बोलण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी वसंतराव मानकुमरे, कोअर कमिटीचे मच्छिंद्र क्षीरसागर यांची व दत्ता गावडे, योगेश गोळे यांच्याशी जोरदार बाचाबाची झाली. ही शाब्दिक चकमक अखेर हमरी-तुमरीवर आली. दरम्यान, याबाबतचा निर्णय आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा करून घेऊ, अशी भूमिका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आल्याने पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते संभ्रमात असल्याची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, अमित कदम यांना या उमेदवार मुलाखत प्रक्रियेमध्ये पूर्ण डावलल्याने कदम गटाची नाराजी झाल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)