शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जागा चुकीची ते आधी समजले नाही का?

By admin | Updated: June 17, 2016 00:22 IST

उदयनराजेंचा सवाल : तांबवेतील पडलेल्या टाकीची केली पाहणी

कऱ्हाड/तांबवे : तांबवेतील पाणी योजनेची पडलेली टाकी ठेकेदाराने नव्याने बांधून द्यावी. तसेच याप्रकरणी क्वालिटी कंट्रोलची तपासणी करण्यात येईल. त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय येथील पंचायत समितीच्या बैठकीत घेण्यात आले. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी तांबवे येथे भेट देऊन पाण्याच्या टाकीची पाहणी केली. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जागा चुकीची आहे हे टाकी उभारण्यापूर्वी समजले नाही का, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, सरपंच संतोष कुंभार, उपसरपंच धनंजय ताटे, सदस्य प्रदीप पाटील, आबासाहेब पाटील, जावेद मुल्ला, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुल्ला, ग्रामविकास अधिकारी प्रमोद ठोके उपस्थित होते. बैठकीमध्ये सभापती पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडून झालेल्या घटनेची वस्तुस्थिती जाणून घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगूनही जीवन प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित राहीले नसल्याबाबत गटविकास अधिकारी फडतरे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर ग्रापंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची बाजू मांडली. त्यामध्ये संबंधित टाकी नवीन उभारून द्यावी, नुकसानग्रस्त गाड्यांची भरपाई देण्यात यावी, सर्व योजनेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी पदाधिकारी व सदस्यांनी केली. या योजनेचे ठेकेदार जानुगडे यांनी संबंधित योजनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून टाकी नव्याने बांधून देणार असल्याची ग्वाही दिली. सभापती पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता यमगर यांच्याशी संपर्क साधून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील कार्यवाही तातडीने करण्यास सांगितले. बैठकीमध्ये पाणी योजनेच्या पडलेल्या टाकीप्रकरणी क्वालिटी कंट्रोलची तपासणी करण्यात येईल. त्याचबरोबर याप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. पडलेली टाकी ठेकेदारांनी नव्याने बांधून द्यावी, असे ठरवण्यात आले. खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी पाण्याच्या टाकीची पाहणी केली. त्यावेळी बांधकामातच कमी दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे उदयनराजे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ठेकेदारांसह दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. टाकी चुकीच्या जागी बांधण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने यावेळी सांगितले. त्यावेळी टाकी बांधण्यापूर्वी तुम्हाला हे समजले नाही का, असा प्रतीप्रश्न उदयनराजे यांनी केला. उदयनराजेंच्या या प्रश्नावर अधिकारी गप्प झाले. (प्रतिनिधी/वार्ताहर)